नांदेड| नांदेड जिल्हातील हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या बाबत आज दि. 17 जानेवारी 2025 रोजी लातूर येथे मा डॉ. अर्चना भोसले-किर्दक मॅडम, उपसंचालक, आरोग्य सेवा लातूर, मा डॉ वैशाली तांभाळे मॅडम, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप ) लातूर यांना नांदेड जिल्यातील हिवताप व हत्तीरोग (Hivta and Elephant Disease) विभागातील कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या बाबत निवेदन देण्यात आले.

आश्वासित प्रगती योजना (10,20,30) लाभ देय बाबत लवकरच मा. विभागीय समितीची बैठक घेण्यात यावी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य कर्मचारी, क्षेत्र कर्मचारी यांची दि. 1.1.2025 रोजी विभागीय सेवा जैष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात यावी. आरोग्य कर्मचारी संवर्गातून आरोग्य निरीक्षक पदी पदोन्नती, क्षेत्र कर्मचारी संवर्गातून आरोग्य कर्मचारी पदी पदोन्नती करण्यात यावी या व इतर मागण्या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली लवकरच मागण्या मान्य करण्यात येतील असे नांदेड जिल्हा संघटना पदाधिकारी यांना सांगण्यात आले.

यावेळी सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर कार्यालयातील राहुल जाधव सहाय्यक अधिक्षक, शेटकार मॅडम,सचिन कुलकर्णी, प्रभाकर मोरे, अखिल कुलकर्णी, नांदेड जिल्हा हिवताप संघटना जिल्हाध्यक्ष व राज्य पदाधिकारी सत्यजीत टिप्रेसवार, सरचिटणीस माणिक गिते, उपाध्यक्ष चंद्रभान धोंडगे, प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी श्याम अवचार, आरोग्य निरीक्षक देवानंद बोधगिरे, बालाजी कल्हाळे व अंनत धुळशेट्टे आदी पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
