कंधार, सचिन मोरे| येथील सर्व धर्माचे एकतेचे प्रतिक असलेले सुप्रसिद्ध महान सूफी संत हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम सय्यद सईदोद्दीन रफाई रहेमतुला अलैही यांच्या ७१० व्या व मौलवीशाहा रफाई यांच्या उर्सला बुधवार १७ पासून प्रारंभ झाला. संदल मिरवणुक (sandal procession) धुमधडाक्यात काढण्यात अली. मिरवणुकीचे दर्शन घेण्यासाठी सर्व जाती धर्माचे भविक भक्तांनी एकच गर्दी केली होती.

असरच्या नमाज नंतर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता दर्गाचे सज्जादा सय्यद शाह मुर्तुजा मोहियोद्दीन रफाई व मुतवली सय्यद शाह मुजतबा मोहियोद्दीन रफाई यांच्या मार्गदनाखाली उर्स कमेटीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष जफरोद्दीन बाहोद्दीन यांच्या नेतृत्वाखाली रज्जबची १६, शुक्रवार १७ जानेवारी रोजी संदल ची भव्य मिरवणुकीत ढोल, ताशाच्या गजरात शहरातील दर्गापूरा, जुनी नगरपालिका, गांधी चौक येथून मुख्यमार्गावरून मार्गक्रमण करीत रात्री उशीरा दर्गात पोहचेले.

संदलची मिरणूक निघताना माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, कांग्रेस तालुका अध्यक्ष संजय भोसीकर, माजी जि प सदस्य डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, माजी नगरसेवक शाहाजी नळगे, माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी स्वप्नील लुंगारे, माजी नगराध्यक्ष रामराव पवार, माजी नगरसेवक प्रफुल बडवणे, माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी चेतन केंद्रे, राजकुमार केकाटे, मधुकर डांगे, कृष्णा भोसीकर, राजेंद्र कांबळे, मारुती गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१८ रोजी कुस्त्यांची दंगल व १९ रोजी कव्वाली तर हास्यकवी संमेलन
१८ जानेवार (शनिवार ) रोजी दुपारी ३ वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे. संध्याकाळी ८ वाजता टी.व्ही. स्टार गायक मिना नाज (मुंबई) व बॉलीवुड स्टार गायक अमन साबरी (मुंबई) यांचा कव्वालीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच १७ व १८ जानेवारी रोजी लंगरचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी १९ जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजता कुलहिंद मजाहीया मुशायरा (हास्यकवी संमेलन) आयोजित करण्यात आला आहे.

या कवी संमेलनात नामांकित कवी डॉ. माजीद देवबंदि (दिल्ली), उस्मान मिनाई (बाराबंकी), मोहन मुंतजीर (नैनीताल), ईस्माईल नजर (देवास), अलतमश तालीब (नांदेड), नैना नसिब (कोटा), अरशद नुरी (हैद्राबाद), कमलाकर दिलेर (भैसा), खटपट भैसवी (तेलंगाना), मुजावर मालेगावी (मालेगाव) सहभागी होणार आहेत. या सर्व कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन उर्स कमिटीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष जफरोद्दीन बाहोद्दीन यांच्या वतीने करण्यात आले आहे.