किनवट, परमेश्वर पेशवे| कै.प्रल्हादरावजी गरुड माध्यमिक विद्यालय नेहमीच विविध सहशाले उपक्रम घेण्यात परिसरात अग्रेसर आहे .अशाच प्रकारे विद्यालयांमध्ये दिनांक 15 व 16 जानेवारी 2025 रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन घेण्यात आला. विद्यार्थ्याला स्वतः शालेय प्रशासनाचा अनुभव घेता यावा व विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावे याच उद्देशाने स्वयंशासन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सदरील विद्यालयाने दोन दिवस पूर्ण शाळेचा कारभार इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हाती सोपवून दिलेला होता .तसेच खालच्या वर्गांना अध्यापन करण्याचे कार्य देखील अतिशय छान पद्धतीने, कुठलाही अडथळ्याविना विद्यार्थ्यांनी उत्साहामध्ये पार पाडले. सदरील दिवशी इयत्ता दहावी मधील विद्यार्थी डुकरे दत्ता याने मुख्याध्यापक म्हणून चांगल्या प्रकारे काम पाहिले.

तकळल शिक्षक म्हणून मयुरी कांबळे ,नीरज सुद्देवाड, आदित्य गोपणवाड, संदेश बागडे ,कृष्णा चव्हाण ,ओंमकार पोतुलवाड, तनुजा चटलेवाड , हेमलता नंदनवार , अनुजा वनेकर, साई श्रीमंगल ,कांबळे प्रतीक, पांडुरंग भंडारे ,जोगदंड अनिरुद्ध ,शेळके कुणाल ,मीरा चंद्रभान ,चिकणे शैलेजा, पत्तेराव स्वप्नाली, माने प्रियांका,उरे अरतिका, सुद्देवाड अविनाश, काळे अडेलु,कदम अमिता, श्रीकांत डोंगरे ,आदित्य वाघमारे, प्रणव डोंगरे, माने प्रियांका,जान्हवी कदम,वानखेडे अदित्य,देवके स्नेहल ,ज्योती गडपाळे ईत्यादी विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून कामकाज पाहिले.तर गोरठे धनश्री ,मुंडे पंकजा, देवके सुप्रिया आणि डुकरे दत्ता या विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून शिकवताना आलेले अनुभव व्यक्त केले.

सदरील कार्यक्रमास संस्थेचे प्रतिनीधी संदिपजी गरुड,मुख्याध्यापक जाधव एस.बी.प्राचार्य भोसले डि.एल.,श्री काळे एस.एच. यांनी मार्गदर्शन केले.तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी वायाळ आर एस ,ढाले आर के,केदार आर पी,पाटिल के बी,सेवक पोहेकर व आडे यांनी प्रयत्न केले.या कार्यक्रमाचे सुञसंचालन मयुरी कांबळे व हेमलता नंदणवार या विद्यार्थींनींनी केले.तर सदरील कार्यक्रमाचे नियोजण व अभार प्रदर्शन श्री काळे एस.एच. यांनी केले.
