नांदेड| नांदेडच्या आनंद नगर परिसरात भुरट्या चोराकडून हातगाडे वाल्याची लूट (a handcart was looted by a sneaky thief) केली जात असल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकाराकडे पोलिसांनी लक्ष देऊन नागरिकांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

शहरातील आनंद नगर परिसरात राज मॉल जवळ पहाटे 4:30 वाजता भाजीपाला विक्रेता भाजी खरेदीसाठी जात असताना दोन युवकांनी पकडुन जबर मारहाण करत पैसे व मोबाईल हिसकावून पळ काढला. अश्या भुरट्या चोऱ्या वाटमारी शहरात होत असेल तर कोणीही सुरक्षित नाही असा सूर जनतेतून निघत आहे.

सन्माननीय पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार (Superintendent of Police Abinash Kumar) यांनी अश्या प्रकाराकडे जातीने लक्ष देऊन शहरातील भुरट्या चोरांना कठोर कारवाई करावी आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने कठोर पाऊले उचलावीत, शहरातील अनेक भागातील भाजी विक्रेते हे पहाटेच भाजीपाला खरेदीसाठी हातगाडे घेऊन जात असतात त्यांचे कडे माल खरेदी साठी नगदी पैसे असतात हे भुरट्या चोरांनी हेरले असून, या पुढे भाजी विक्रेत्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे मात्र अश्या घटना होणार नाहीत याकडे पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे अशी मागणी नागरिकांतुन केली जाते आहे.
