हदगाव, शेख चांदपाशा| प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर (Mla. Baburaoji Kadam Kohlikar) यांनी सर्व सामान्य जनतेच्या सेवांचा वास चालू ठेवत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन 25 जानेवारी 2025 गंगाराम पाटील हायस्कूल, निवघा (बा.) ता. हदगाव जि. नांदेड करण्यात आले आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मागील अनेक वर्षपासून हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारात सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याचे हिट लक्षात घेऊन आरोग्य शिबिराचे आयोजन करतात. त्याचा पार्श्वभूमीवर यंदाही मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर हदगाव तालुक्यातील गंगाराम पाटील हायस्कूल, निवघा (बा.) ता. हदगाव जि. नांदेड येथे दैनांक 25 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून निःशुल्क तपासणी मोफत, भरती रुग्णांना खाट शुल्क, जेवण मोफत, भरती रुग्णांना सर्व सामान्य चाचण्या उदा. (एक्स-रे, रक्त, लघवी चाचणी, सोनोग्राफी) मोफत, महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी केली जाईल, अतिविशिष्ट चाचण्या (सि.टी. स्कॅन, एम.आर, आय इत्यादी चाचण्या) आवश्यकतेनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत, डॉक्टरांच्या सल्यानुसार इ. सी. जी तपासणी मोफत केल्या जाईल, विविध आजारावरील शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा. असे आवाहन हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी केले आहे.
