किनवट, परमेश्वर पेशवे| प्रशांत पुरसिंग राठोड कक्ष अधिकारी मुंबई हे आपल्या गाव भेटी दौऱ्यानिमित्त त्यांच्या सहकार्यासह मूळ गावी पालाई गुडा येथे त्यांचे मोठे बंधू किनवटचे नायब तहसीलदार यांना भेटण्यासाठी जात असताना प्रथम त्यांनी किनवटच्या दयाळ धानोरा येथील त्यांचे भाऊजी प्रकाश सक्रु जाधव यांची भेट घेऊन ते गावी जात असताना इस्लापूर वाशीयांनी त्यांची भेट घेऊन विश्राम गृह येथे त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

याप्रसंगी कक्ष अधिकारी प्रशांत पुरसिंग राठोड यांनी आपल्या गाव व तालुक्याविषयी असलेला जिव्हाळा आणि गावकऱ्यांविषयी जपलेले प्रेम पाहता मी कदापी विसरू शकत नाही आणि माझ्या वडिलांनी बोधडी येथील अंधविद्यालयामध्ये केलेली नोकरी पाहता आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला किनवट माहूर तालुका हे माझ्यासाठी अस्मरणीय आहे आणि ते कायमस्वरूपी राहिल! याच माय भूमी मधून आम्ही मोठ्या पदावर जरी गेलो तरी आम्ही कदापि या किनवट माहूर तालुक्याला विसरू शकत नाही त्यामुळे मी वर्षाच्या काठी मी एक वेळेस का होईना… माझ्या मूळ गावी जात असतो असे ते सांगायला विसरले नाहीत.

किनवट मागासलेला आदिवासी बहुल भाग असुन आम्हा इस्लापूर वाशीयांना सिंचनासह कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उंच पातळीचा बंधारा परोटी येथे झाला तर आमच्यासाठी ही तुमची देण ठरेल अशी कैफियत येथील सरपंच प्रतिनिधी नारायण शिनगारे उपसरपंच प्रतिनिधी बालाजी दूरपडे पाटील व येथील पत्रकार परमेश्वर पेशवे यांनी सर्व सामाजिक हिताचे प्रश्न उपस्थित केले असता मी एक प्रशासकीय अधिकारी आहे! सर्व सामाजिक हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण येथील स्थानिकचे आमदार व खासदार यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे तुमची मागणी उपस्थित करून हे सर्व सामाजिक हिताचे प्रश्न सोडवू व मी एक प्रशासकीय अधिकारी असल्याने माझ्याने जेवढी मदत करता येईल तेवढी मी आपल्याला मदत करेल असे ते यावेळी बोलत होते.

यावेळी त्यांच्या समावेत उपस्थित असलेले प्रदीप पवार, राजू राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सूर्यकांत आरंडकर, इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनुप देशमुख, संचालक प्रतिनिधी प्रकाश सक्रु जाधव,शिवणीचे गणेश पाटील, संतोष जाधव, कैलास जाधव, पत्रकार गौतम कांबळे हे उपस्थित होते.
