Chief Minister : मुख्यमंत्री महोदयाच्या व स्थानिक आमदाराच्या माध्यमातून सर्वसामाजिक हिताचे प्रश्न सोडवू
किनवट, परमेश्वर पेशवे| प्रशांत पुरसिंग राठोड कक्ष अधिकारी मुंबई हे आपल्या गाव भेटी दौऱ्यानिमित्त त्यांच्या सहकार्यासह मूळ गावी पालाई गुडा येथे त्यांचे मोठे बंधू किनवटचे नायब तहसीलदार यांना भेटण्यासाठी जात असताना प्रथम त्यांनी किनवटच्या दयाळ धानोरा येथील त्यांचे भाऊजी प्रकाश सक्रु जाधव यांची भेट घेऊन ते गावी जात असताना इस्लापूर वाशीयांनी त्यांची भेट घेऊन विश्राम गृह येथे त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी कक्ष अधिकारी प्रशांत पुरसिंग राठोड यांनी आपल्या गाव व तालुक्याविषयी असलेला जिव्हाळा आणि गावकऱ्यांविषयी जपलेले प्रेम पाहता मी कदापी विसरू शकत नाही आणि माझ्या वडिलांनी बोधडी येथील अंधविद्यालयामध्ये केलेली नोकरी पाहता आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला किनवट माहूर तालुका हे माझ्यासाठी अस्मरणीय आहे आणि ते कायमस्वरूपी राहिल! याच माय भूमी मधून आम्ही मोठ्या पदावर जरी गेलो तरी आम्ही कदा...
