HomeनांदेडParmeshwar temple : श्रावण महिन्यात श्री परमेश्वर मंदिरात भव्य धार्मिक कार्यक्रम; प्रशासनाकडून मंगळवारी पूर्वनियोजन बैठक

Parmeshwar temple : श्रावण महिन्यात श्री परमेश्वर मंदिरात भव्य धार्मिक कार्यक्रम; प्रशासनाकडून मंगळवारी पूर्वनियोजन बैठक

हिमायतनगर, प्रतिनिधी | पवित्र श्रावण महिन्यानिमित्त हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात भव्य धार्मिक कार्यक्रम व कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या काळात तेलंगणा, कर्नाटक, विदर्भ तसेच मराठवाड्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था तसेच भाविकांच्या सोयीसाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यानिमित्त प्रशासनाकडून मंगळवार दिनांक 11रोजी पूर्वनियोजन बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद्र श्रीश्रीमाळ यांनी तहसील कार्यालयाकडे निवेदन देऊन श्रावण महिन्यातील धार्मिक कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य मिळावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार तहसीलदार, हिमायतनगर यांनी नगरपंचायत, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना आवश्यक नियोजनासाठी कळविले आहे.

श्रावण महिन्यात मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये तसेच गर्दीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वाहतूक व्यवस्था, वीजपुरवठा, आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्था याबाबत विशेष नियोजन करण्यात येणार आहे.

याच पार्श्वभूमीवर श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटी येथे पूर्वनियोजन व आढावा बैठक आयोजित करण्यात आली असून, उपविभागीय अधिकारी, हदगाव यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. तहसीलदारांनी सर्व संबंधित कार्यालय प्रमुखांनी बैठकीस वेळेवर उपस्थित राहून आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश दिले आहेत.

श्रावण महिन्यात श्री परमेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टच्या समन्वयातून भाविकांना सुरक्षित व सुरळीत दर्शनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments