नांदेड| नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निर्वाचित झालेले आमदार डॉ. तुषार राठोड तसेच उपाध्यक्षपदी निर्वाचित झालेल्या डॉ. मीनलताई पाटील खतगावकर यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.


जिल्हा बँकेच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्याबद्दल दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी पुष्पगुछ देऊन अभिनंदन केलं. शेतकरी आणि बँकेच्या सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून जिल्हा बँकेला अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रगतिशील करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाला शुभेच्छा देण्यात आल्या.


जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्था आणि सभासदांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भूमिका महत्त्वाची असून, नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून बँकेच्या कामकाजाला अधिक गतिमानता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



अध्यक्षपदी डॉ. तुषार राठोड आणि उपाध्यक्षपदी डॉ. मीनलताई पाटील खतगावकर यांच्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

