नांदेड l सांगली येथे नुकतेच जिजाऊ ब्रिगेडचे ७ अधिवेशन राज्यस्तरीय अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनास नांदेड जिल्ह्यातील 40 महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
या अधिवेशनासाठी नांदेड च्या विभागीय अध्यक्षा डॉ. विध्याताई पाटील,जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्या अरुणाताई जाधव, विभागीय कार्यअध्यक्षा सौ मीनाक्षीताई पाटील ,नांदेड जिजाऊ ब्रिगेड च्या दोन्ही ( दक्षिण, उत्तर ) सुमित्राताई वडजकर,कल्पनाताई चव्हाण यांच्या पुढाकराखाली महिला सहभागी झाल्या होत्या.
सांगली येथे मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडचे ७ वे राज्यस्तरीय अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाला उद्घाटक म्हणून डॉ. अश्विनिताई घोरपडे, सरसेनापती संताजी घोरपडे यांचे वंशज व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, स्वागताध्यक्ष स्वप्नालिताई कदम यांनी मार्गदर्शन केले. तसेच मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष इं. विजयकुमारजी घोगरे, शिवश्री. अर्जुनराव तनपुरे, प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके, प्रदेश महासचिव स्नेहाताई खेडेकर याप्रसंगी राज्यभरातून जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जिजाऊ ब्रिगेड सांगली जिल्हाध्यक्षा प्रणिताताई पवार व सर्व सांगली जिजाऊ ब्रिगेड, त्याचबरोबर हरिपूर ग्रामशाखा जिजाऊ ब्रिगेड यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सर्व जिजाऊंच्या लेकींचे स्वागत केले.
अधिवेशनात विविध सामाजिक प्रश्नावर चर्चा झाली. जिजाऊ चे विचार घेऊन समाज जागृती करणे आणि जिजाऊ मा साहेबाना अपेक्षित समाज घडवणे हा निर्धार व्यक्त करण्यात आला अशी माहिती जिजाऊ ब्रिगेड च्या विभागीय कार्यअध्यक्षा सौ मीनाक्षीताई पाटील यांनी सांगितले.