Jijau Brigade ; सांगलीच्या जिजाऊ ब्रिगेड अधिवेशनास 40 महिला पदाधिकारी उपस्थित.. – NNL
नांदेड l सांगली येथे नुकतेच जिजाऊ ब्रिगेडचे ७ अधिवेशन राज्यस्तरीय अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनास नांदेड जिल्ह्यातील 40 महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
या अधिवेशनासाठी नांदेड च्या विभागीय अध्यक्षा डॉ. विध्याताई पाटील,जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्या अरुणाताई जाधव, विभागीय कार्यअध्यक्षा सौ मीनाक्षीताई पाटील ,नांदेड जिजाऊ ब्रिगेड च्या दोन्ही ( दक्षिण, उत्तर ) सुमित्राताई वडजकर,कल्पनाताई चव्हाण यांच्या पुढाकराखाली महिला सहभागी झाल्या होत्या.
सांगली येथे मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडचे ७ वे राज्यस्तरीय अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाला उद्घाटक म्हणून डॉ. अश्विनिताई घोरपडे, सरसेनापती संताजी घोरपडे यांचे वंशज व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, स्वागताध्यक्ष स्वप्नालिताई कदम यांनी मार्गदर्शन केले. तसेच मराठा सेवा संघाच...
