Wednesday, May 13

Tag: Whitefly attacks sugarcane crop in Hadgaon taluka

Shugarcane Crop : हदगाव तालुक्यातील ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा हल्ला हजारो हेक्टरवरील पीक संकटात…!

Shugarcane Crop : हदगाव तालुक्यातील ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा हल्ला हजारो हेक्टरवरील पीक संकटात…!

कृषी, नांदेड, व्हिडीओ
हदगांव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील ऊस पिकांवर सध्या पायरेलिया (पांढरी माशी) किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊस धोक्याच्या टोकावर पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, या कीड नियंत्रणात न आणल्यास ६० ते ७० टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील हरडफ, धोतरा, हडसणी, बणचिंचोली, गुरफळी, बाभळी, कोथळा, गोरलेगाव, वाकोडा, गोजेगाव आणि पैनगंगा नदी किनारी असलेल्या गावांतील ऊस पीक प्रचंड प्रमाणात रोगग्रस्त झाले आहे. खोडवा ऊस पिकामध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे दिसून आले आहे. पांढऱ्या माशीची पिल्ले ऊसाच्या पानाच्या खालच्या बाजूस लपून बसतात व पाने शोषून त्यातील हरितद्रव्य नष्ट करतात. परिणामी पाने लालसर होत असूनअन्ननिर्मिती प्रक्रिया थांबते आणि उसाची वाढ थांबते. ऊसाची उंच वाढ झाल्याने पारंपरिक पद्धतीने माणसाच्या सहाय्याने फवारणी करणे अशक्य झाल...
error: Content is protected !!