HomeनांदेडPimpalgaon Shri Datta Sansthan : पिंपळगाव श्री दत्त संस्थानात एकादश लक्ष पार्थिव...

Pimpalgaon Shri Datta Sansthan : पिंपळगाव श्री दत्त संस्थानात एकादश लक्ष पार्थिव लिंगार्चना पूजन

श्रावण मासानिमित्त भाविकांसाठी धार्मिक उपक्रम; बालयोगी व्यंकट स्वामी महाराजांचे भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन

हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हदगाव भोकर हिमायतनगर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळगाव येथील श्री दत्त संस्थानमध्ये एकादश लक्ष पार्थिव शिवलिंगार्चना पूजन यज्ञाचे आयोजन पवित्र श्रावण मासानिमित्त करण्यात आले आहे. या धार्मिक उपक्रमात परिसरातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भगवान श्री महादेवांचे कृपाशीर्वाद प्राप्त करावेत, असे आवाहन बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी केले आहे.

श्रावण मासाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या पार्थिव शिवलिंग पूजनामध्ये दररोज सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत भाविकांना सहभागी होता येणार आहे. १३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा धार्मिक उपक्रम सुरू राहणार आहे.

पार्थिव शिवलिंगाची पूजा ही भगवान महादेवाच्या भक्तीतील अत्यंत पवित्र साधना मानली जाते. श्रावण महिन्यात या पूजनाला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने भाविकांसाठी ही सेवा व पूजेची मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व भाविकांनी कुटुंबासह या पवित्र पूजनात सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. पूजेला बसण्यासाठी पूर्वनोंदणी व संपर्कासाठी : ९८३४२११२१७, ९८९००३६२९१ हर हर महादेव! ॐ नमः शिवाय!

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments