Homeआरोग्यGovernment Medical College : IIRF क्रमवारीत नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी

Government Medical College : IIRF क्रमवारीत नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी

देशात १११ वा, महाराष्ट्रात ११ वा क्रमांक; राष्ट्रीय स्तरावर गुणवत्तेची दखल

नांदेड| देशभरातील वैद्यकीय संस्थांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणाऱ्या IIRF Ranking 2026 मध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपुरी, नांदेडने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशातील वैद्यकीय संस्थांच्या क्रमवारीत महाविद्यालयाने १११ वा, तर महाराष्ट्रात ११ वा क्रमांक मिळविला आहे. ही कामगिरी नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

IIRF क्रमवारीमध्ये वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षणाची गुणवत्ता, पायाभूत सुविधा, संशोधन, शैक्षणिक वातावरण, प्रात्यक्षिक व क्लिनिकल प्रशिक्षण, रुग्णसेवा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध निकषांच्या आधारे संस्थांचे मूल्यांकन केले जाते. या निकषांमध्ये नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने केलेली कामगिरी राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे.

मुंबई, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांतील नामांकित वैद्यकीय संस्थांसोबत नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने राष्ट्रीय क्रमवारीत स्थान मिळविणे ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासोबत मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवाही दिली जाते. विविध विभागांमार्फत तज्ज्ञ उपचार, निदान सुविधा आणि आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देतानाच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णसेवेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते.

डॉ. सुधीर देशमुख यांच्या नेतृत्वाला यशाची जोड – महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या दूरदृष्टीपूर्ण व गतिमान नेतृत्वाखाली शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित विकासाच्या क्षेत्रात सातत्याने सकारात्मक वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या दीर्घकालीन विकासाला प्राधान्य देत शैक्षणिक, प्रशासकीय आणि रुग्णसेवेची गुणवत्ता अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षक, निवासी डॉक्टर, विद्यार्थी, परिचारिका, तंत्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. ही कामगिरी कोणत्याही एका घटकाची नसून संपूर्ण महाविद्यालय व रुग्णालयाच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय क्रमवारीतील या यशामुळे महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीला नवी प्रेरणा मिळाली असून, भविष्यात राष्ट्रीय क्रमवारीत आणखी वरचे स्थान मिळविण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, रुग्णसेवा आणि प्रशासकीय कार्यक्षमता अधिक बळकट करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहेत. देशातील आघाडीच्या वैद्यकीय संस्थांमध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेने नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments