नांदेड l इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने नुकत्याच आयएमए महास्पोर्ट्स स्पर्धा घेण्यात आल्या. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व एसजीजीएस महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर पार पडलेल्या स्पर्धेत विविध जिल्ह्यातून आलेल्या डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. डॉक्टरांमध्ये क्रीडाप्रेम जागृत करण्याच्या आणि एकात्मता वाढवण्याच्या करण्यात आले होते.. दर वर्षी IMA MAHASPORTS एका जिल्ह्यात डॉक्टर्स साठी आयोजित केले जाते. यावेळी ही स्पर्धा नांदेड IMA तर्फे आयोजित केली होती.
यात फायनल सामन्यात डॉ. प्रमोल हंबर्डे यांनी ३३ चेंडूमध्ये नाबाद ७८ धावा काढत संघाला विजय मिळवून दिला. त्यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेदरम्यान आयएमए मावेरिक्सच्या सर्व खेळाडूंनी अपवादात्मक कामगिरी केली. यावेळी हंबर्डे म्हणाले, सर्व सहकाऱ्यांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानामुळेच आम्हाला हा विजय मिळवता आला. प्रत्येकाने आपल्या भूमिकेला योग्य प्रकारे न्याय दिला आणि एकत्रित प्रयत्नातून विजेतेपद प्राप्त केले. राज्यभरातील डॉक्टरांनी स्पर्धेत सहभाग घेतल्यामुळे स्पर्धेचा उत्साह द्विगुणित झाला. यासाठी आयएमएचे डॉ. प्रल्हाद कोटकर, डॉ. राजेश नुने, डॉ. राहुल लव्हेकर, डॉ. वीरेंद्र अवधिया, डॉ. तजमूल पटेल आदी पदाधिकाऱ्यांसह मेडिकल असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला.
फोटो ओळी – आयएमए महास्पोर्ट्समधील आयएमए नांदेड मावेरिक्स विजयी संघ
आयएमए महा स्पोर्टस स्पर्धेत 600 च्या वर डॉक्टर सहभागी नांदेड IMA तर्फे 25 26 27 ऑक्टोबर रोजी महा स्पोर्टस 2024 या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या आता राज्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्य डॉक्टरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवात 600 च्या वर डॉक्टरांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवात स्पर्धा उत्साहात संपन्न होण्यात वाटा उचलला
महा स्पोर्टस 2024 ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता नांदेड चे आयएमए प्रेसिडेंट डॉ. प्रल्हाद कोटकर ,सेक्रेटरी डॉ. राहुल लव्हेकर, व्हाईस प्रेसिडेंट डॉ. राजेश नुने व स्पोर्ट्स सेक्रेटरी डॉ. वीरेंद्र अवधिया तसेच डॉ. ताजामूल पटेल आणि सम्पूर्ण महा स्पोर्ट्स टीमने अथक परिश्रम घेतले