IMA Mahasports ; IMA महास्पोर्ट्स क्रीड़ा प्रतियोगिता नांदेड़ मधे सम्पन्न – NNL
नांदेड l इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने नुकत्याच आयएमए महास्पोर्ट्स स्पर्धा घेण्यात आल्या. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व एसजीजीएस महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर पार पडलेल्या स्पर्धेत विविध जिल्ह्यातून आलेल्या डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. डॉक्टरांमध्ये क्रीडाप्रेम जागृत करण्याच्या आणि एकात्मता वाढवण्याच्या करण्यात आले होते.. दर वर्षी IMA MAHASPORTS एका जिल्ह्यात डॉक्टर्स साठी आयोजित केले जाते. यावेळी ही स्पर्धा नांदेड IMA तर्फे आयोजित केली होती.
यात फायनल सामन्यात डॉ. प्रमोल हंबर्डे यांनी ३३ चेंडूमध्ये नाबाद ७८ धावा काढत संघाला विजय मिळवून दिला. त्यांना 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेदरम्यान आयएमए मावेरिक्सच्या सर्व खेळाडूंनी अपवादात्मक कामगिरी केली. यावेळी हंबर्डे म्हणाले, सर्व सहकाऱ्यांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानामुळेच आम्हाला हा विजय मिळवता आला...
