हदगाव शेख चांदपाशा| मागे काय झाल हे विसरुन जा… ह्यानंतर नागरिकांच्या साध्या कामा करिता प्रशासनाद्वारे आडवणुक होता कामा नये. अश्या कडक सुचना हदगाव विधानसभा क्षेञाचे आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी शुक्रवारी तहसिल कार्यालयाच्या प्रगाणांत आयोजित केलेल्या प.स.पाणी टंचाई व जनता दरबार बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. महसूल व पोलीस प्रशासनाच्या बाबतीत मात्र त्यांची नरम भूमिका दिसून आली.
विविध कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना कानपिचक्या देत आमदार कोहळीकर पुढे म्हणाले की, मी सहजासहजी आमदार झालेलो नाही. मला सहज म्हणून घेवु नका मला तळागाळात सर्वसामान्याच्या काय समस्या असतात याची जाणीव आहे. जो कोणी प्रशासनाचा अधिकारी किवा कर्मचारी जाणुनबुजुन सरळ कामाला अडचणी निर्माण करत असेल. तर त्याला सरळ कसे करयाच हे मला माहित आहे, त्यामुळे यांची वेळ कुणीही येवु देवु नये अश्या कडक शब्दात त्यांनी सुनावले. यावेळी मंचावर माजी खा. सुभाष वानखेडे, माजी जिप सदस्य आनिल पा. बाभळीकर, शिवसेना जिल्हा अध्यक्ष विवेक देशमुख, जेष्ठ शिवसैनिक गोपाल सारडा, आदीसह तहसिलदार सुरेखा नांदे, गटविकास अधिकारी, पुरवठा अधिकारी, महावितरण, लघु, पांटबंधारे विभागाचे आभियंता यांची उपस्थिती दिसुन आली.
यावेळी जनतेने उपस्थित केलेल्या समस्यांचा धागा धरू ते म्हणाले कि, मी आमदार म्हणून नागरिकांच्या समस्याचे निराकरण करने हे माझ कामच आहे. विविध विभागाशी संबंधित तक्रारी एकाच छताखाली निकाली निघाव्यात यासाठी “जनता दरबाराचे” आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून जनतेच्या काय समस्या आहेत हे आता आधिका-याना प्रत्यक्षात समजले आहे. अस आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले. विशेष म्हणजे ग्रामीण भागातुन निवेदनाद्वारे विविध तक्रारीचा पाऊसच पडत असतांना बैठकीतून दिसुन आले. हि जनता दरबार बैठक रात्रीचे ७ वाजले तरी सुरूच होती, त्यामुळे जनतेला आता आपल्या समस्यां मार्गी लागतील अशी आशा लागली आहे.
प्रशासनाला पञकाराने जाणीव करुन दिली
हदगाव तालुक्यातील नियमित दैनिकास शासनाच्या व केद्र शासनाच्या योजना विषयी स्थानिय प्रशासना कडुन मातीती देण्यात येत नाही. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत मतदान टक्का वाढविण्यासाठी स्थानिय पञकानी निवडणूक विभागाला निस्वार्थ पणे राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून सहकार्य केले. किमान पञकारदिनाच्या दिवशी तरी तहसिलदार किवा उपविभागीय अधिका-यानी पत्रकारांचा सन्मान करायला हव होता. तसेच 18 डिसेबर हा अल्पसंख्याक दिवस तहसिल किवा पोलिस स्टेशन कडुन का साजरा होत नाही. एखाद्या पत्रकाराने सामाजिक दृष्टिकोनातून सूचना केली तर पोलीस प्रशासनाकडून दखल पण घेण्यात येत नाही. या बाबतीत या जनता दरबार मध्ये पञकाराने प्रश्न उपस्थित केला. या जनता दरबार बैठकीला विविध खात्याचे प्रमुख अधिकारी अनुपस्थित दिसून आले. बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या त्या अधिकारी, कर्मचाऱ्यावर आमदार महोदय काय कार्यवाही करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.