हिमायतनगर, अनिल मादसवार| गावठाणसाठी लोड शेडिंग मुक्त विद्युत पुरवठा देऊन गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी आणि गावातील लोकांना माणसासारखे जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सिरंजनीसाठी मंजूर असलेले स्वतंत्र फिडरचे काम त्वरित मार्गी लावण्याची मागणी सिरंजनी येथील सरपंच सौ. मेघा पवन करेवाड यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, मौजे सिरंजनी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड हे जवळपास चार हजार लोकसंख्या वस्तीचे गाव आहे. महावितरण विभागाकडून येथे बेकायदेशररित्या दिवसाला पाच तास लोड सेडींग घेतल्या जात आहे. इतरही वेळात लाईटचा लपंडाव सारखा चालू असल्याने गावातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत लोड सेडिंग घेत असल्यामुळे सकाळी उठून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कधीही न भरून निघणारे शैक्षणिक नुकसान होत आहे.
तसेच सकाळी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून, आम्ही ग्रामीण भागात राहत असलो तरी माणसं आहोत याचे भान ठेवून महावितरण प्रशासनाने आम्हाला 24 तास लाईट उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत अनेकदा विजेच्या समस्येसाठी गावकर्यांनी महावितरण कार्यालयास तोंडी व लेखी मागणी केली होती. मात्र याकडे महावितरणचे संबंधित हंडीकरी जाणीवरूपर्वक डोळेझाक करून ग्रामदिन भागातील नागरिकांना नाहक त्रास देत आहेत. यामुळे शेतकऱयांची तर झोपमोड होतच असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अनेक पाठपुराव्यानंतर नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील सर्वात मोठे व चळवळीचे गाव म्हणून परिचित असलेल्या सिरंजनी गावाला 24 तास थ्री-फेस लाईट देण्यासाठी स्वतंत्र फिटर मंजूर झालेले असून, हे काम सुरू करण्यास महावितरण प्रशासनाकडून कडून जाणीवपूर्वक विलंब केल्या जात आहे. त्यामुळे विद्यार्थीं, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत. हि बाब लक्षात घेता हे काम त्वरित चालू करून आमचा छळ थांबवावा असेही देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
उपकार्यकारी अभियंता, उपविभागीय कार्यालय, हिमायतनगर जिल्हा नांदेड याना दिलेल्या निवेदनात असेही म्हंटले आहे कि, सादर कार्यालयाकडे सुरळीत विद्युत पुरवठा मिळण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केलेला असून, सुद्धा आमच्या मागणीला तुम्ही मस्करीच्या स्वरूपात घेत असल्याचे आम्हाला जाणीव होत आहे. आम्ही गावातून जास्तीत जास्त लोक नियमितपणे विद्युत बिल भरत असतो तरीसुद्धा महावितरण कडून आम्हाला मोफत वीज पुरवठा करून आमच्यावर उपकार केल्यागत सुविधा मिळत आहे. त्यामुळे लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास आम्ही गावकरी एकमताने विद्युत बिल भरण्यावर बहिष्कार टाकणार आहोत. याची गंभीर दखल घेऊन सिरंजनी येथे लोड सीडींग मुक्त सुरळीत विद्युत पुरवठा उपलब्ध करून द्यावा असेही ग्राम पंचायत कार्यालय, सिरंजनीच्या सरपंच सौ. मेघा पवन करेवाड यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.