नांदेड| येथील कॅनल रोड डी मार्ट समोरील अपरंपारस्वामी फिजिओथेरपी कॉलेज येथे फिजिओथेरपी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभात पदवीचे प्रदान करण्यात आले.
मंगळवार रोजी दि. 1 ऑक्टोबर 2024 रोजी अपरंपार स्वामी फिजिओथेरेपी कॉलेज, नांदेड येथे दिक्षांत समारंभ आणि स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कॉलेजच्या संस्थाचालक श्रीमती रीतादेवी जयप्रकाश मुंदडा, श्रीमती रत्नाताई मुंदडा, डॉ. शारदा अजय मुंदडा या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेंद्र पाटील आणि प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार डी. उपस्थितीत होते. व्यवस्थापक डॉ. वैष्णवी नव्हाते, डॉ. वर्षा सदावर्ते, डॉ. कनीज फातेमा, डॉ. स्नेहा अंभोरे,श्री. भालेराव रमेश व पालकवर्ग, विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.