Homeक्राईमAccident news : अज्ञात वाहनाच्या धडकेत ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू

Accident news : अज्ञात वाहनाच्या धडकेत ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू

हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव-वारंगा राष्ट्रीय महामार्गावरील बामणी फाट्यापासून शिबदरा रोडवरील मामीडवार पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (३१ जुलै) सकाळी उघडकीस आली.

गुरुवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसानंतर शुक्रवारी सकाळी पाऊस थांबल्यावर स्थानिक नागरिक बाहेर पडले असता, रस्त्यालगत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याची माहिती तत्काळ मनाठा पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी व पोलीस उपनिरीक्षक पिराजी गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

तपासादरम्यान मृताची ओळख राजू रंगराव बोंडे (वय ३२, रा. भोस्कर गल्ली, हदगाव) अशी पटली. अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय, हदगाव येथे पाठविण्यात आला.

राजू बोंडे यांच्या पश्चात आई आणि मुलगी असा परिवार असून, शुक्रवारी सायंकाळी हदगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातातील अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून, पुढील तपास मनाठा पोलीस करीत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments