Homeनांदेडअल्प पावसाचे दुःख बाजूला सारत हिमायतनगरात सर्जा-राजाचा थाटात पोळा!

अल्प पावसाचे दुःख बाजूला सारत हिमायतनगरात सर्जा-राजाचा थाटात पोळा!

ढोल-ताशांचा दणदणाट, मानाच्या बैलजोडीची दिमाखदार मिरवणूक; दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या मैदानात रंगला पारंपरिक विवाह सोहळा

हिमायतनगर, अनिल मादसवार | डोळ्यांसमोर करपणारी पिके, आभाळाकडे लागलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आणि अल्प पावसाने निर्माण झालेले संकट… तरीही या सगळ्या वेदना बाजूला सारत बळीराजाने आपल्या सर्जा-राजाचा सण दणक्यात साजरा केला! वर्षभर शेतात खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा हिमायतनगर शहरात यंदाही पारंपरिक जल्लोषात साजरा झाला.

खांदेमळणीपासूनच पोळ्याची लगबग सुरू झाली होती. शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांच्या शिंगांना आकर्षक रंग देत, झुली, गोंडे, कासरे, डोर आणि विविध सजावटींनी सर्जा-राजाला सजविले. अल्प पावसामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत असला तरी आपल्या बैलांवरील प्रेमात मात्र कुठलीही कमतरता दिसली नाही.

मानाच्या बैलजोडीची दिमाखदार मिरवणूक – सायंकाळी चार वाजता श्री परमेश्वर मंदिरापासून नगरपंचायतीच्या मानाच्या बैलजोडीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब, श्री परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, नगरपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, मान्यवर आणि मोठ्या संख्येने शेतकरी या मिरवणुकीत सहभागी झाले.

IMG20260910161519 01 अल्प पावसाचे दुःख बाजूला सारत हिमायतनगरात सर्जा-राजाचा थाटात पोळा!
oplus_16

ढोल-ताशांचा दणदणाट, पारंपरिक वेशभूषा आणि सजविलेल्या बैलजोड्या यामुळे शहरातील वातावरण अक्षरशः पोळामय झाले. मिरवणूक दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या मैदानात पोहोचल्यानंतर सर्वांचे लक्ष लागले होते ते मानाच्या बैलजोडीच्या विवाह सोहळ्याकडे.

IMG20260910155730 01 अल्प पावसाचे दुःख बाजूला सारत हिमायतनगरात सर्जा-राजाचा थाटात पोळा!
oplus_16

४.५० वाजता मंगलाष्टकांचा गजर – ठरलेल्या सायंकाळी ४ वाजून ५० मिनिटांच्या शुभमुहूर्तावर मानाच्या बैलजोडीचा पारंपरिक विवाह सोहळा थाटात पार पडला. पुरोहित गजू गुरु वाळके यांच्या मधुर वाणीतून पाच मंगलाष्टकांचा गजर झाला आणि उपस्थित शेतकरी बांधवांनी या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचा उत्साह अनुभवला. शहरातील शेकडो शेतकरी आपल्या सर्जा-राजाला घेऊन या सोहळ्यात सहभागी झाले होते. विवाह सोहळा संपताच बैलांची मिरवणूक पुन्हा जोमाने निघाली आणि सर्जा-राजा आपल्या मालकाच्या घराकडे रवाना झाला.

IMG20260910163456 scaled अल्प पावसाचे दुःख बाजूला सारत हिमायतनगरात सर्जा-राजाचा थाटात पोळा!
oplus_2097152

सर्जा-राजाची पूजा; पुरणपोळीचा नैवेद्य – घरी पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोडीचे विधिवत पूजन करून आरती केली. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत बळीराजाने आपल्या खऱ्या सहकाऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

IMG20260910175452 scaled अल्प पावसाचे दुःख बाजूला सारत हिमायतनगरात सर्जा-राजाचा थाटात पोळा!
oplus_2097152

यंदाच्या अल्प पावसाच्या संकटातून शेतकरी आणि शेतीला लवकरच उभारी मिळावी, शेतात पुन्हा हिरवाई नांदावी आणि यंदाची सुगी सुख-समृद्धी, भरभराट व धनधान्य घेऊन यावी, अशी प्रार्थना प्रत्येक शेतकरी कुटुंबातून करण्यात आली. दरम्यान, नगरपंचायतीच्या वतीने बैलपोळ्या निमित्त पुरणपोळीच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक भोजनाने बैलपोळा उत्सवाची सांगता झाली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments