Homeराजकीयग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना १२ महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर...

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना १२ महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार

मुंबई| ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आता निवडून आल्याचे घोषित झाल्यापासून १२ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र ( caste validity certificate ) सादर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी ‘महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, २०२६’ काढण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

९ फेब्रुवारी २०२६ रोजी किंवा त्यानंतर, मात्र अध्यादेश लागू होण्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांनाही ही तरतूद लागू होणार आहे.

निर्धारित १२ महिन्यांच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित व्यक्तीची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाल्याचे मानले जाईल. तसेच संबंधित व्यक्ती सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा पंचायत समिती सभापती या पदांवर राहण्यास अपात्र ठरेल.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments