HomeकृषीPloting News : हिमायतनगर शहरातील सर्वे न. २८५ मधील बेकायदेशीर अकृषक आदेश...

Ploting News : हिमायतनगर शहरातील सर्वे न. २८५ मधील बेकायदेशीर अकृषक आदेश रद्द करावे – दत्ता शिराणे यांची जिल्हाधिकार्याकडे मागणी

हिमायतनगर, प्रतिनिधी| शहरातील शेत सर्वे न. २८५, २८९, २८४, २८३ असे एकून क्षेत्रफळ २११०० चौ. मीटर क्षेत्राचे दि. २ फेब्रूवारी २००२ चे अनाधिकृत व बेकायदेशीर आदेश तात्काळ रद्द करण्यात येवून नाल्यावर झालेले अतिक्रमण हटविण्यात यावे. अशी मागणी भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे तालूकाअध्यक्ष दत्ता शिराणे यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनात शिराणे यांनी म्हटले आहे की, शेत सर्वे न. २८५, २८९, २८४, २८३ एकून क्षेत्रफळ २११०० चौ. मिटर क्षेत्र असून, सदरील शेत सर्वे क्रमांकाचे मालक श्री जयराम सिद्धेश्वर कंचलवार यांचे दिपक किशन नारलावार, संजय सिद्धेश्वर कंचलवार यांच्याकडे सामाईक जमिन होती. परंतू दि. ५ फेब्रूवारी २००२ रोजी तिघांचे सामाईक क्षेत्र असताना फक्त जयराम सिद्धेश्वर कंचलवार यांनी अकृषीक परवानगी वैयक्तिक, बेकायदेशीरपणे अकृषीक परवानगी मिळविली आहे. सामाईक क्षेत्रामध्ये सर्व खातेदार यांच्या नावे एकून जमिन २•१ हेक्टर आहे.

परंतू अकृषक परवान्यामध्ये २११००चौरस मिटर क्षेत्रफळ दर्शविले आहे. व तसेच सातबारयावर २०१०० चौरस मिटर क्षेत्रफळ आहे. ते १००० चौरस मिटर जास्तीचे दाखवून वाढवून घेवून शासनाची दिशाभूल केली आहे. अकृषीक परवानगी काढण्यापूर्वी अर्जदाराने ग्रामपंचायत हिमायतनगर यांचे नाहरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.परंतू तसे आदेशामध्ये नमूद केलेले नाही. व तसेच प्लाॅटींगच्या ब्लूप्रिंट नकाशावर मा. तहसिलदार यांची स्वाक्षरीही नाही.

हिमायतनगर हे गांव विकास आराखड्यात असल्यामुळे सहाय्यक नगर रचनाकार यांचे नाहरकत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. परंतू आदेशामध्ये तसा उल्लेख दिसून येत नाही. व त्याच बरोबर अर्जदाराने १४३ मुकांदाची मोजनी फी १४ हजार ४५० रूपये भरलेली आहे. परंतू आता जायमोक्यावर १७३ प्लाॅट टाकून आदेशात नमूद केलेल्या १४३ प्लाॅटचे आकारमान कमी करून तब्बल १७३ प्लाॅट विक्रीसाठी काढले आहेत. महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ कलम १४४ प्रमाणे प्लाॅटींग मध्ये मुख्य रस्ता हा ३० फूटाचा असणे आवश्यक आहे. व तसेच इतर अंतर्गत रस्ते २० फूटाचे असणे आवश्यक आहे. परंतू मुळ मालकाने मुख्य रस्ता हा २० फूटाचा असून अंतर्गत रस्ते १० व १५ फुटाचे केले आहेत. खुली व मोकळी जागा ही सोडलेली नाही.

लेआऊटच्या नकाशावर प्रत्येक प्लाॅटचे आकारमान व लांबी रूंदीचा उल्लेख केलेला दिसून येत नाही. त्यामुळे एकून प्लाॅटींगचे क्षेत्रफळ जुळत नाही. मुळ मालकांनी वरिल सर्वे न.ची तालूका निरिक्षक भुमिअभिलेख हिमायतनगरकडून मोजी नकाशा हा आदेश पारीत करण्यापुर्वी देणे बंधनकारक आहे. परंतू मुळ मालकांनी सर्वे न. ची मोजनी दि. २५,फेब्रूवारी २०१४ रोजी केलेली असून,ती नियमबाह्य आहे.तेंव्हा अकृषीक आदेशातील उल्लेख नसतांना काहीं बाबीची खाडाखोड करूण नवीन लेआऊट व दस्ताऐवज तयार केले असून, ते आता आयपीएस, सिआरपी नूसार शिक्षेस पात्र आहेत.म्हणून वरिल सर्व नियमबाह्य अकृषीक आदेश क्र २००१ दि. ५ फेब्रूवारी २००२ चे आदेश रद्द करण्यात यावे. व तसेच किनवट नांदेड महामार्गावरून जाणार्या नाल्यावर झालेले अतिक्रमण काढण्यात येवून हा नाला पूर्वी प्रमाणे निसर्ग नियमाप्रमाणे प्रवाहीत ठेवावा. अशी मागणी भाजपचे दत्ताभाऊ शिराणे यांनी जिल्हाधिकार्याकडे निवेदन देवून केली आहे. सदर कार्यवाहीबाबत प्रशासनाकडून विलंब, अथवा टाळाटाळ झाल्यास येत्या १५ ऑगष्ट स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा ही शिराणे यांनी दिला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments