नांदेड (प्रतिनिधी) अल्प पावसामुळे निर्माण झालेल्या पीक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुयणी येथे शेतशिवारात जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पावसाचे प्रमाण, पिकांची सद्यस्थिती आणि संभाव्य नुकसानीची माहिती घेतली.


शेतकऱ्यांनी यावेळी पिकांचे नुकसान, पावसाची अनिश्चितता आणि निर्माण झालेल्या अडचणी कृषिमंत्र्यांसमोर मांडल्या. भरणे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला.



“शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करू नये. शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे. पीक परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील,” अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.




यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

