हिमायतनगर,प्रतिनिधी| मौजे एकंबा व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांसाठी श्री कानिफनाथ महाराज यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री नवनाथ महाराज यांच्या कृपेने हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार असून, पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गावकरी मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.


सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मौजे एकंबा येथे श्री कानिफनाथ महाराज यांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. हा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पिंपळगाव मंदिराचे महंत बालयोगी श्री व्यंकटेश स्वामी महाराज तसेच पुरोहित श्री गजानन वाळके गुरु यांच्या शुभहस्ते धार्मिक विधी व मंत्रोच्चारांच्या वातावरणात संपन्न होणार आहे.


प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी कुटुंबासह उपस्थित राहून श्री कानिफनाथ महाराजांचे दर्शन घ्यावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी नम्र विनंती गावकरी मंडळी, एकांबा यांच्या वतीने करण्यात आली आहे. या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने एकंबा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.




