HomeकृषीLightining Calf was killed : हिमायतनगरच्या बोरगडी येथे वीज पडून वासरू ठार:...

Lightining Calf was killed : हिमायतनगरच्या बोरगडी येथे वीज पडून वासरू ठार: आखाडा जळून खाक

हिमायतनगर, बाबाराव जरगेवाड| हिमायतनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथे शुक्रवार दिनांक 26 रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात वीज कोसळून एक दुर्दैवी घटना घडली  आहे. कष्टकरी शेतकरी प्रभाकर संभाजी भाकरे यांच्या गट क्र. 212 शिवारातील गोठ्यावर वीज कोसळल्याने एका वासराचा मृत्यू झाला.

याचसोबत शेतातील महत्त्वाचे साहित्य जसे की, मोटारपंप, खत, पाईप, स्प्रिंकलर इत्यादी पूर्णपणे जळून खाक झाले. त्यामुळे संबंधित शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. हिमायतनगर तालुका सह बोरगडी परिसरात जोरदार पावसासोबत विजांचा कडकडाट सुरू असून, मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यासह राज्यभरात वीज व पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

एकूणच अतिवृष्टीच्या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून कष्टकरी शेतकऱ्यांना सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे उभे राहणे कठीण झाले आहे. शेती नुकसानीसह वीज पडून झालेल्या नुकसानीबाबत संबंधित शेतकऱ्याच्या आखाड्याचा तात्काळ पंचनामा करून योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments