Homeनांदेड२२ सप्टेंबरला ठरणार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण

२२ सप्टेंबरला ठरणार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण

नांदेड, अनिल मादसवार | ग्रामपंचायतींच्या आगामी राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत अखेर २२ सप्टेंबरला होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण महिलांसह निश्चित केले जाणार आहे.

ग्रामविकास विभागाच्या १२ ऑगस्ट २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये एकाच दिवशी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. संबंधित तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली सोडत काढली जाणार असून, उपविभागीय अधिकारी नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी पाहणार आहेत.

नांदेड, भोकर, हदगाव, किनवट, धर्माबाद, बिलोली, देगलूर आणि कंधार येथे सकाळी १० वाजता, तर हिमायतनगर, माहूर, उमरी, नायगाव (खै.), मुखेड आणि लोहा येथे दुपारी ३ वाजता सोडत होणार आहे.

आरक्षण जाहीर होताच कोणत्या ग्रामपंचायतीत कोणता प्रवर्ग येणार, याचे चित्र स्पष्ट होणार असून इच्छुक सरपंचपदाच्या उमेदवारांच्या हालचालींनाही वेग येण्याची शक्यता आहे. प्रशासनाने ही प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडण्याचे स्पष्ट केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments