Homeनांदेडनांदेड जिल्ह्यातील ४४ उमेदवार तीन वर्षांसाठी पालिका सदस्य होण्यास अपात्र

नांदेड जिल्ह्यातील ४४ उमेदवार तीन वर्षांसाठी पालिका सदस्य होण्यास अपात्र

निवडणूक खर्चाचा हिशोब वेळेत सादर न केल्याने कारवाई; राजपत्रात नावे प्रसिद्ध

नांदेड| नांदेड जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ मध्ये पार पडल्या. निवडणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येक उमेदवाराने आपल्या निवडणूक खर्चाचा हिशोब विहित मुदतीत आणि विहित पद्धतीने संबंधित कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक होते.

मात्र, निवडणूक खर्चाचा हिशोब निर्धारित मुदतीत आणि नियमानुसार सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील ४४ उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १६(१ड) अन्वये या उमेदवारांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी पालिका सदस्य होण्यास अनर्ह ठरविण्यात आले आहे.

यासंदर्भातील आदेश २७ जुलै २०२६ रोजी निर्गमित करण्यात आले. त्यानंतर संबंधित उमेदवारांची नावे ५ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

कोणत्या नगरपरिषदेत किती उमेदवार?

स्थानिक स्वराज्य संस्था अपात्र उमेदवार
उमरी नगरपरिषद
भोकर नगरपरिषद
लोहा नगरपरिषद
हिमायतनगर नगरपंचायत १४
धर्माबाद नगरपरिषद
किनवट नगरपरिषद
मुखेड नगरपरिषद
कंधार नगरपरिषद
एकूण ४४

निवडणूक खर्चाचा हिशोब विहित वेळेत सादर करणे हे प्रत्येक उमेदवाराचे कायदेशीर कर्तव्य आहे. या नियमाचे पालन न केल्यास संबंधित कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments