नांदेड| नांदेड जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा 2024 या मोहिमे अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. या निमित्त जिल्हा परिषद व जिल्हयातील सर्व पंचायत समित्यांमधून कार्यालय व परिसराची स्वच्छता करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले. आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या या उपक्रामत अधिकारी व कर्मचा-यांनी स्वच्छता उपक्रम राबवून कार्यालयाची स्वच्छता केली.


महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिनांक 2 ऑक्टोबरला स्वच्छ भारत दिवस साजरा केला जातो. याच अनुषंगाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा 2024 पंधरवाडा देशभरात साजरा केला जात आहे. यानिमित्त जिल्हयातही विविध स्वच्छतेचे उपक्रम घेतले जात आहेत. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या आवाहनानुसार आज जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये आणि जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत कार्यालयांची स्वच्छता व साफसफाई करण्यात आली असून परिसर चकाचक करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.


यामध्ये जिल्हा परिषदेतील खाते प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेव्दारे कार्यालये स्वच्छ करण्यात आली आहेत. स्वच्छता ही सेवा या मोहिमेसाठी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ह थीम असून या नुसार जिल्ह्यात स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोहिमेत दिलेला प्रतिसाद उत्तम असल्याने कार्यालये आणि परिसर स्वच्छ व चकचकीत झाला आहे.
