नांदेड| महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा जातो. त्या निमित्त दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा पंधरवडा संपूर्ण देशभरात राबवला जात आहे. या मोहिमेत स्वच्छता जागरूकता वाढवण्यासाठी आणि नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रम जिल्हयात घेतले जात आहे.


स्वच्छता ही सेवा या मोहिमे अंतर्गत नांदेड जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत त्यांनी पंधरवड्यात गावांमध्ये स्वच्छता मोहिमा, सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, तसेच स्वच्छता संबंधित स्पर्धा आणि उपक्रम याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

स्वभाव स्वच्छता व संस्कार स्वच्छता ही यावेळच्या स्वच्छता ही सेवा मोहिमेची थीम आहे. लोकसहभाग हा या अभियानाचा मुख्य घटक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या मोहिमेत प्रत्येक व्यक्तीने आपल्या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे. तरी श्रोत्यांनी सदर मुलाखत ऐकावी असे आवाहन नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी तथा कार्यालय प्रमुख विश्वास वाघमारे यांनी केले आहे.
