देगलूर /शहापूर, प्रतिनिधी | ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शहापूर येथील पी. एम. श्री. जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये ‘आमची माती आमची माणसं’ समूहाच्या वतीने निबंध, वक्तृत्व आणि रांगोळी आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल १४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रेडर गंगारेड्डी कोटगिरे होते. स्पर्धेचे उद्घाटन माजी सनदी अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मल्लन रेड्डी चिंतलवार, जगदीशरेड्डी चिंतलवार, सरपंच लक्ष्मण भंडारे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अॅड. एच. के. पोतदार, विलासरेड्डी यालावार, अमोल चिंतलवार आणि विकास नरबागे उपस्थित होते.



रांगोळी स्पर्धेत विद्यार्थिनींनी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि देशभक्तीपर विषय रेखाटत आपली कलात्मकता दाखवून दिली यात प्रथम : कु. अक्षरा यशवंत कांबळे द्वितीय : कु. श्रिनुष्का बालाजी बाशेटवार, तृतीय : कु. अंबिका माधव खंडगावे



निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य, राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक विषयांवर आपले विचार प्रभावीपणे मांडले. प्रथम : कु. अस्मिता पिराजी सुसकिरे, द्वितीय : कु. रितिका संतोष गुंतापल्ले, तृतीय : कु. त्रिशा संतोष चिंतावार
वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने विविध विषयांवर आपले विचार मांडत उपस्थितांची दाद मिळवली. प्रथम : कु. जोया हुसेन शेख, द्वितीय : कु. भाग्यश्री परमेश्वर गोंटलवार, तृतीय : कु. लावण्या संतोष याचावाड
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षणासोबतच विविध स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे ठरते. ‘आमची माती आमची माणसं’ समूहाने आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कला, विचार आणि वक्तृत्व कौशल्याला व्यासपीठ मिळाले. उपस्थित मान्यवरांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदाचे विशेष सहकार्य लाभले. तसेच ‘आमची माती आमची माणसं’ समूहाचे ज्ञानेश्वर गुंतापल्ले, गोपाळ पडमटवार, सरिता जडलावार, प्रतीक देशमुख, सचिन गायकवाड आणि उस्मान खाजा पिंजारी यांनी विशेष परिश्रम घेतले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देतानाच त्यांच्यामध्ये देशभक्ती, आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेची भावना रुजविण्याचा सकारात्मक प्रयत्न करण्यात आला.

