नांदेड| नांदेड येथील गोवर्धन घाट पुलावरून १७ आगस्ट रोजी एका युवकाने नदीमध्ये उडी मारली होती, परंतु खाली नदीमध्ये उपस्थित असलेल्या गोदावरी जीवरक्षक दलाच्ये सय्यद नुर सय्यद एकबाल यांच्या मार्गदर्शना खाली सय्यद मुस्ताक, शेख हबीब, शेख लतीफ,सलीम शेख या स्वयंसेवकांनी तात्काळ त्या युवकास नदीच्या बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले.


सय्यद नुर सय्यद एकबाल अध्यक्ष जीवरक्षक दल यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित असलेल्या जीवरक्षक दलाचे सहकारी यांनी युवकाचे प्राण वाचवले असुन सदरील युवकाचे नाव नागनाथ गजरवाड रा.पौर्णिमा नगर असल्याचे कळाले. सदर घटनेबाबत गोदावरी जीव रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली.

डॉक्टरांनी सदरील युवकास तपासले व तो युवक धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.सदरील युवकाचे प्राण वाचवल्याबद्दल गोदावरी जीव रक्षक दलाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
