Homeकरियरemployment is half full : अर्धापूरात भरला रोजगाराचा महाकुंभ; साडेसहा हजार तरूणांचा...

employment is half full : अर्धापूरात भरला रोजगाराचा महाकुंभ; साडेसहा हजार तरूणांचा सहभाग

नांदेड| पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडूण आल्यानंतर चांगले काहीतरी करून दाखविण्याच्या भावनेने प्रेरीत झालेल्या आ.श्रीजया चव्हाण यांच्या पुढाकारातून साकारलेल्या रोजगार मेळाव्यात रोजगाराचा जणू आज महाकुंभच भरला होता. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील साडेसहा हजार बेरोजगार युवक-युवतींनी या महाकुंभात आपला सहभाग नोंदविला. त्यातील तब्बल दीड हजार जणांची विविध पदांसाठी निवड करण्यात आली. रोजगार मेळावा हा नांदेड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरला आहे.

अर्धापूर येथे दि.22 रोजी रोजगार मेळाव्याचे आ.श्रीजया चव्हाण यांनी आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी आ.श्रीजया चव्हाण व त्यांची टीम मागील दोन महिन्यांपासून अहोरात्र मेहनत घेत होती. त्याचीच फलश्रुती म्हणून हा भव्यदिव्य रोजगार मेळावा संपन्न झाला. पुणे, मुंबईला लाजवेल अशी कार्पेरेट व्यवस्था पाहून विविध कंपन्यांचे अधिकारी यांच्यासह प्रमुख पाहुणेसुध्दा या व्यवस्थेवर प्रभावित झाले.

3 2 employment is half full : अर्धापूरात भरला रोजगाराचा महाकुंभ; साडेसहा हजार तरूणांचा सहभाग

आजच्या मेळाव्यात मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई, नागपूर, हैद्राबाद, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आदी ठिकाणच्या नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, किया मोटर्स, केन्स टेक्नॉलॉजी, एसबीआय लाईफ, आयसीआयसीआय, टाटा मोटर्स, एमआरएफ टायर्स, हायर, फियाट, बजाज इलेक्ट्रिकल्स, फिनोलेक्स केबल, कोरोमंडल फायनान्स, तिरूमला ग्रुप, इंडूरन्स ग्रुप, एल ॲण्ड टी, सायबेरोथॉन आदी नामांकित कंपन्यांचा सहभाग होता.

1 1 employment is half full : अर्धापूरात भरला रोजगाराचा महाकुंभ; साडेसहा हजार तरूणांचा सहभाग

या सर्व कंपन्यांतील विविध पदांसाठी 6 हजार 500 पेक्षा अधिक युवक, युवतींनी मुलाखती दिल्या. त्यातील दीड हजार बेरोजगारांची विविध पदांवर निवड करण्यात आली. एखाद्या रोजगार मेळाव्यातील ही निवड संख्या मोठी मानली जाते. त्यामुळे रोजगाराचा अर्धापूरमध्ये भरला महाकुंभ असेच म्हणावे लागेल.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments