employment is half full : अर्धापूरात भरला रोजगाराचा महाकुंभ; साडेसहा हजार तरूणांचा सहभाग
नांदेड| पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडूण आल्यानंतर चांगले काहीतरी करून दाखविण्याच्या भावनेने प्रेरीत झालेल्या आ.श्रीजया चव्हाण यांच्या पुढाकारातून साकारलेल्या रोजगार मेळाव्यात रोजगाराचा जणू आज महाकुंभच भरला होता. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील साडेसहा हजार बेरोजगार युवक-युवतींनी या महाकुंभात आपला सहभाग नोंदविला. त्यातील तब्बल दीड हजार जणांची विविध पदांसाठी निवड करण्यात आली. रोजगार मेळावा हा नांदेड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरला आहे.
अर्धापूर येथे दि.22 रोजी रोजगार मेळाव्याचे आ.श्रीजया चव्हाण यांनी आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी आ.श्रीजया चव्हाण व त्यांची टीम मागील दोन महिन्यांपासून अहोरात्र मेहनत घेत होती. त्याचीच फलश्रुती म्हणून हा भव्यदिव्य रोजगार मेळावा संपन्न झाला. पुणे, मुंबईला लाजवेल अशी कार्पेरेट व्यवस्था पाहून विविध कंपन्यांचे अधिकारी यांच्यासह प्रमुख पाहुणेसुध्दा या व्यवस्थेवर प्...
