HomeनांदेडBank needs : हिमायतनगरला मोठ्या बँकांच्या शाखांची गरज - C.A.भावेश पिंचा

Bank needs : हिमायतनगरला मोठ्या बँकांच्या शाखांची गरज – C.A.भावेश पिंचा

फायनान्स कंपन्यांच्या कर्जजाळ्यात सर्वसामान्य नागरिक;  ५२ ग्रामपंचायतींचा विस्तीर्ण परिसर; शेतकरी, बचत गट, व्यापारी व सर्वसामान्य ग्राहकांसाठी बँकिंग सुविधा अपुऱ्या

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व परिसरात राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांची संख्या तुलनेने कमी असल्याने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, महिला बचत गट तसेच लघुउद्योजकांना आर्थिक व्यवहार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हिमायतनगर शहरात मोठ्या बँकांच्या शाखा वाढविण्याची गरज असल्याचे मत भावेश पिंचा सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) यांनी व्यक्त केले आहे. यापूर्वीही नवीन बैंका आणणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली, असे असतानाही अद्याप त्याकडे संबंधित विभाग अथवा राजकीय नेत्यांनी गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याची भावना नागरिक बोलून दाखवीत आहे.

हिमायतनगर तालुका तेलंगणा आणि विदर्भ राज्याच्या सिमेला लागून असल्याने येथील बाजारपेठ मोठी उलाढाल होणारी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. या तालुक्यात ५२ ग्रामपंचायतींचा मोठा ग्रामीण परिसर असून या संपूर्ण भागातील नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांसाठी हिमायतनगर हे महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, परिसराची लोकसंख्या, भौगोलिक विस्तार आणि वाढत्या आर्थिक व्यवहारांच्या तुलनेत शहरातील बँकिंग सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. सध्या शहरात राष्ट्रीयीकृत दोन, जिल्हा बैंक एक आणि खासगी दोन बँका कार्यरत आहेत. मात्र, वाढत्या ग्राहकसंख्येच्या तुलनेत या शाखांवर मोठा ताण येत असून कर्ज, पीककर्ज, बचत खाते, महिला बचत गटांचे व्यवहार, व्यवसाय कर्ज, वाहन कर्ज, गृहकर्ज तसेच इतर आर्थिक सेवांसाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत.

HDFC, ICICI, Axis, Bank of Baroda सारख्या मोठ्या बँकांच्या शाखांची मागणी
हिमायतनगर शहरात HDFC Bank, ICICI Bank, Axis Bank, Bank of Baroda यांसारख्या मोठ्या राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या शाखा सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होऊ शकतो. नवीन बँका आल्यास ग्राहकांना पर्याय उपलब्ध होतील, स्पर्धेमुळे सेवा अधिक गतिमान होण्यास मदत होईल आणि कर्जासाठी फायनान्स कंपन्यांवर अवलंबून राहण्याची गरज काही प्रमाणात कमी होऊ शकते. विशेषतः शेतकऱ्यांसाठी पीककर्ज, कृषी कर्ज, ट्रॅक्टर व शेती अवजारे कर्ज, बचत गटांसाठी कर्ज सुविधा, लघुउद्योजकांसाठी व्यवसाय कर्ज आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी विविध बँकिंग सुविधा सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे.

फायनान्स कंपन्यांच्या कर्जजाळ्याचा प्रश्न
तातडीने कर्ज उपलब्ध होत असल्याने अनेक नागरिक फायनान्स कंपन्यांकडे वळत आहेत. मात्र कर्जाची एकूण परतफेड, व्याजदर, प्रक्रिया शुल्क, विमा व इतर आकारणी यांची माहिती पूर्णपणे न समजल्यास कर्जाचा आर्थिक बोजा वाढू शकतो. काही नागरिकांना एका कर्जाची परतफेड करण्यासाठी दुसरे कर्ज घेण्याची वेळ येत असल्याने ‘कर्ज फेडण्यासाठी कर्ज’ घेण्याचे दुष्टचक्र निर्माण होत असून, अश्या कर्जापाई अनेकांनी जीवन्यात्रा संपवील्याच्या घटना घडल्या आहेत, भविष्यात अश्या प्रकाराला आळा घालण्यासाठी हिमायतनगर शहरात सारख्या तालुक्याच्या ठिकाणी मोठया बैंक स्थापन होण्याची आवश्यकता आहे. यावर उपाय म्हणून ग्रामीण भागात पारदर्शक आणि सुलभ बँकिंग व्यवस्था मजबूत होणे आवश्यक आहे. अधिक बँका उपलब्ध झाल्यास नागरिकांना विविध वित्तीय संस्थांच्या कर्ज योजनांची तुलना करता येईल आणि आपल्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडता येईल.

शेतकरी व बचत गटांना मोठा फायदा होईल 
हिमायतनगर परिसराची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज आणि कृषीविषयक आर्थिक सुविधा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील महिला बचत गट, छोटे व्यावसायिक, दुकानदार आणि नवउद्योजक यांनाही बँकिंग कर्जाची गरज असते. नवीन बँक शाखा सुरू झाल्यास शेतकरी, महिला बचत गट, व्यापारी, लघुउद्योजक आणि सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक व्यवहारांसाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. त्यामुळे स्थानिक पातळीवर आर्थिक व्यवहार वाढण्यासही मदत होऊ शकते.

IMG 20260814 164721 Bank needs : हिमायतनगरला मोठ्या बँकांच्या शाखांची गरज - C.A.भावेश पिंचा
राजकीय नेत्यांसह बँक व्यवस्थापनाने पाठपुरावा करावा
हिमायतनगर शहरात नवीन राष्ट्रीयीकृत तसेच मोठ्या खासगी बँकांच्या शाखा सुरू करण्याची मागणी यापूर्वीही करण्यात आली आहे. मात्र, अद्याप या मागणीला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय नेते आणि संबंधित बँक व्यवस्थापनाने याबाबत पुढाकार घेऊन मोठ्या बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी C.A.भावेश पिंचा व हिमायतनगर शहर परिसरातील जागरूक नागरिकांतून होत आहे. ५२ ग्रामपंचायतींचा विस्तीर्ण परिसर, वाढती लोकसंख्या आणि वाढते आर्थिक व्यवहार लक्षात घेता हिमायतनगर शहरात नवीन बँक शाखांची आवश्यकता आता केवळ मागणी राहिलेली नसून ती काळाची गरज बनली आहे. त्यामुळे संबंधितांनी तातडीने लक्ष देऊन नवीन राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या शाखा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments