नवीन नांदेड| भरधाव वेगात, वेडी वाकडी फटाके फोडत बुलेट चालविण्या-या एकावर नांदेड ग्रामीण पोलीसांनी बुलेट जप्त करून कार्यवाही केली आहे. या कार्यवाहीमुळे धूम स्टाईलने वाहने चालविणाऱ्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी भरधाव वेगात, वेडी वाकडी फटाके फोडत बुलेट चालविण्या-या व्यक्तीवर कारवाई करण्याचे सर्व पो. स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पो. स्टे. नांदेड ग्रा. येथील पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संतोष जाधव, सतार शेख, माधव माने, ज्ञानेश्वर कलंदर हे पेट्रोलिंग करीत असताना छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर सिडको, नांदेड येथे गणेश भुजंगराव मोरे वय 23 वर्ष व्यवसाय बेकार रा. शाहुनगर वाघाळा नांदेड हा बुलेट रॉयल एनफिल्ड कंपनीची जिचा पासींग क्रमांक MH 26 AW 4211 त्याच्या ताब्यातील वाहन येणारे जाणारे व्यक्तीचे जिवितास व मालमत्तेस धोका होईल अशा पध्दतीने बुलेट गाडीचे एक्सलेटर वाढवुन सायलेंसर मधुन फटाके फोडुन सायलेन्सरचा मोठा आवाज धमाका करुन गाडी हायगई निष्काळजीपणाने चालवत पळवित होता. त्यावरून त्यास ताब्यात घेवुन 80,000/- रुपये किमतीची बुलेट जप्त करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोहेकॉ. मोरे हे करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. व कलम 1141/2024 कलम 125,281 भारतीय न्याय संहिता अंतर्गत शंकर रेवण माळगे, वय 30 वर्ष व्यवसाय, नौकरी पोकों 1459 नेमणुक-पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड, सुशील कुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा यांचे मार्गदर्शनाखाली ओमकांत चिंचोलकर पोलीस निरीक्षक पो.स्टे. नांदेड ग्रा. पोलीस अंमलदार संतोष जाधव, सतार शेख, माधव माने, ज्ञानेश्वर कलंदर सर्व पो.स्टे. नांदेड ग्रामीण नांदेड यांनी हि कार्यवाही केली आहे.