नांदेड| उस्माननगर पोलीस ठाणे हद्दीतील मौ. वाका येथील आबाजी गणपत हंबर्डे यांचे शेतालगत, वाका ते वाका फाटा जाणारे रोडवर खुनाही घटना घडली होती. पोलिसांनी गोपनिय बातमीदार यांचेकडुन मिळालेल्या माहितीवरुन आरोपीला अटक केली असता हा खून महिलाचे अनैतिक संबधास कारणीभुत व पुर्वीचे वैमनस्य मनात धरुन केल्याचे उघड झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक 04/12/2024 रोजी पोलीस ठाणे उस्माननगर हद्दीत किसन हरी खोसे वय 67 वर्ष व्यवसाय शेती रा. वाका ता. लोहा याचा कोणीतरी अज्ञात आरोपीने खुन केला होता. याप्रकरणी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे बाबत आदेशित केले होते. त्यावरुन उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील सहा. पोलीस निरीक्षक व्हि. एच. घोगरे, पोलीस उप निरीक्षक ए. एम. बिचेवार, साईनाथ पुयड असे व पोलीस ठाणे उस्माननगर येथील सहा. पोलीस निरीक्षक सी. पी. पवार यांचे असे चार पथके तयार करुन, गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत होते. त्यावरून पोलीस पथके मौ. वाका गावात व परीसरात तळ ठोकुन, रात्रंदिवस अथक परिश्रम घेवुन, गोपनिय बातमीदार नेमुन तसेच गावातील घटने संबंधाने ज्ञात व अज्ञात अनेक साक्षीदार यांची पडताळणी करण्यात आली. वरील सर्व प्रयत्नांती दिनांक 10/12/2024 रोजी तपास पथकांना यश आले व सदरचा गुन्हा हा पेरण्यात आलेल्या गोपनिय बातमीदारांनी हस्तगत केलेल्या माहीतीवरुन उडकिस आला आहे.
त्यावरुन आज दिनांक 10/12/2024 रोजी वर नमुद पोलीस पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस ठाणे उस्माननगर गु.र.नं. 217/2024 कलम 103(1) भा. न्या. सं. मधील अज्ञात आरोपीचा शोध घेतला असता, त्यांना गोपनिय माहितीदार यांचेकडुन मिळालेल्या माहिती प्रमाणे मदन आंबादास हंबर्डे वय 36 वर्ष व्यवसाय शेती रा. वाका ता. लोहा जि. नांदेड यास ताब्यात घेतले. आणि विश्वासात घेवुन सदर गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्याने मयत किशन हरी खोसे वय 67 वर्ष व्यवसाय शेती रा. वाका ता. लोहा जि. नांदेड याचा महिलाचे अनैतिक संबंधास कारणीभूत व पुर्वीचे वैमनस्य असल्याचे कारणावरुन दिनांक 04/12/2024 रोजी सकाळी 06.30 वा. चे सुमारास मौ. वाका शिवारातील आबाजी गणपत हंबर्डे यांचे शेतालगत, वाका ते वाका फाटा जाणारे रोडवर आमचे गावातील किशन हरी खोसे यास शेत कामास वापरण्याचे कत्तीने हनवटीवर व पाठीमागुन मानेवर मारून, त्याचा खुन केल्याचे सांगुन, सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यावरुन आरोपी मदन आंबादास हंबर्डे वय 36 वर्ष व्यवसाय शेती रा. वाका ता. लोहा जि. नांदेड यास ताब्यात घेण्यात आले असुन, गुन्हयाचे पुढील तपास कामी पोलीस ठाणे उस्माननगर यांचे स्वाधीन केले आहे.
हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड मा. श्री. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, सी. पी. पवार, सहा. पोलीस निरीक्षक, पो. स्टे. उस्माननगर, व्हि. एच. घोगरे, सहा. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, ए. एच. बिचेवार, पोलीस उप निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड,साईनाथ व्हि. पुयड, पोलीस उप निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी केली आहे. यासाठी पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, किशन मुळे, संजीव जिंकलवाड, विठ्ठल शेळके, राजु डोंगरे, तिरुपती तेलंग, विलास कदम, संतोष बेल्लुरोड, संदिप घोगरे, मोतीराम पवार, अनिल बिरादार, प्रभाकर मलदोडे, विश्वनाथ पवार, मारोती मोरे, धम्मानंद जाधव, रुपेश दासरवार देविदास चव्हाण, साहेबराव कदम, राजीव बोधगीरे, शेख इसराईल, तानाजी येळगे, संजय राठोड, मारोती मुंडे, दादाराव श्रीरामे, अकबर पठाण, सिध्दार्थ सोनकांबळे, अमोल घेवारे, सुधाकर देवकत्ते सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड व पोलीस अंमलदार नामदेव रेजीतवाड, अशोक हंबर्डे, माधव पवार, अनिरुध्द वाडे, अप्पाराव वरपडे, पल्लवी डोळे, पुजा भाटकुळे सर्व नेमणुक पोलीस ठाणे उस्माननगर जि. नांदेड, राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे नेमणुक सायबर सेल, नांदेड यांनी परिश्रम घेतले आहे. सदर गुन्हा उघड करुन, आरोपीस ताब्यात घेवुन नांदेड पोलीसांनी उत्कृष्ट कामगीरी केली आहे. त्याबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी त्यांचे कौतुक केले आहे.