HomeनांदेडProf. Chandrakant Potdar : हास्य चित्रातून मानसिक व्यंगावर प्रहार-प्रा.चंद्रकांत पोतदार

Prof. Chandrakant Potdar : हास्य चित्रातून मानसिक व्यंगावर प्रहार-प्रा.चंद्रकांत पोतदार

नांदेड| हास्य आणि व्यंगचित्र या दोन वेगवेगळ्या कला आहेत. हास्य चित्रातून शारिरीक नाही तर मानसिक व्यंगावर प्रहार केला जातो. असे मत प्रसिद्ध चित्रकार प्रा.चंद्रकांत पोतदार यांनी व्यक्त केले.

नांदेड एज्युकेशन सोसायटी अमृत महोत्सवानिमित्त स्वामी रामानंद तिर्थ संशोधन केंद्र येथे प्रसिद्ध व्यंगचित्रांचे अभ्यासक आणि संग्रहाक मधुकर धर्मापूरीकर यांनी संकलित केलेल्या संगित विषयावरील हास्य चित्रातले स्वर या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा.चंद्रकांत पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा.डॉ. व्यंकटेश काब्दे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड एज्युकेशन सोसायटी अमृत महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष सीए डॉ.प्रविण पाटील हे होते.

यावेळी बोलतांना प्रा.पोतदार म्हणाले की, हास्य आणि व्यंग या दोन वेगवेगळ्या कला आहेत. आर.के.लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या दिग्गज व्यंगचित्रकारांनी या कलेला एक सन्मान मिळवून दिला. हास्य व्यंग चित्रातून चित्रकार आपल्या भावना प्रभावी रेषा आणि विचारातून प्रकट करीत असतात. यामुळे माणसाला एक आनंद मिळतो. कमी शब्दात अत्यंत मार्मीकपणे एखाद्या विषयावर हास्य आणि व्यंगचित्रातून प्रभावी मत व्यक्त होवू शकते असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी विविध हास्य व्यंग चित्रकारांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविकात चित्रकार मधुकर धर्मापुरीकर यांनी प्रदर्शना मागची भूमीका स्पष्ट केली. तर अध्यक्षीय समारोप करतांना डॉ.काब्दे यांनी मानवी जीवन अत्यंत धावपळीचे आणि ताण-तणावाचे झाले आहे.

त्यातून अनेक आजार उत्पन्न होत आहेत. यंत्रा प्रमाणे निर्माण झालेल्या जीवन शैलीत काही हलके-फुलके विनोद माणसाला आनंदी करतात. आनंदी असणेच हे निरोगी जीवनाचा खरा मार्ग आहे असे त्यांनी सांगितले. तर समारोप करतांना सीए डॉ.प्रविण पाटील यांनी धर्मापुरीकर यांच्या कलाकृतीवर हास्य व्यंग चित्रांच्या संग्रहाचे कौतुक केले. यावेळी प्राचार्य आर.एम.जाधव, प्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे, वसंत मैय्या, सुरेश जोंधळे, उपप्राचार्य एकनाथ खिल्लारे, प्रा.सचिन पवार, प्रा.इनामदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यंवर उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments