Homeकृषीguardian minister Girish Mahajan ; अतिवृष्टीचे पंचनामे तात्काळ करा ; पालकमंत्री गिरीश महाजन...

guardian minister Girish Mahajan ; अतिवृष्टीचे पंचनामे तात्काळ करा ; पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनास सूचना – NNL

नांदेड | नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासात जिल्ह्यात सर्व दूर अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेतीपशुधनघरे व अन्य मालमत्तेच्या झालेल्या नुकसानाकडे शासनाचे लक्ष असून पाऊस थांबताच पंचनामे करण्यात यावेअसे आदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज  दिले आहे.

नांदेड मधील अतिवृष्टीच्या संदर्भात आज पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारीमहानगरपालिका आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. जिल्हयातील 93 मंडळापैकी 65 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच प्राथमिक माहितीनुसार अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून पशुधनाचे देखील नुकसान झाले आहे. सध्या पाऊस सुरू आहे.मात्र पाऊस थांबल्यानंतर प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू करावे असे त्यांनी निर्देश दिले आहे.

महानगरपालिका आयुक्तांशी देखील त्यांनी शहरातील नुकसानाचा आढावा घेण्याचे निर्देश दिले असून शासनामार्फत नुकसानीची तातडीची जी मदत आहे ती लवकरात लवकर नागरिकांना मिळेल याबाबतचे नियोजन करण्याचे निर्देशित केले आहे.नांदेड शहरात  काही भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदीकाठावरील घरांमध्ये पाणी घुसले आहे. अशा घरातील रहिवाशांना देय असलेली  योग्य ती मदत शासनामार्फत तात्काळ उपलब्ध करून दिली जावीअसेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील प्रकल्पांचा देखील त्यांनी आढावा आज घेतला. पाटबंधारे विभागाने पाण्याचा निचरा करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्क करावे. गोदावरी पात्राच्या वरील भागात देखील आपण संपर्क साधला असून तेलंगाना राज्यासोबतही वाररूम मधून यंत्रणा संपर्क साधून आहे. शक्यतो पुराचा फटका नागरिकांना बसणार नाही या पद्धतीने पाण्याची नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments