Homeक्राईमBattery Thift Arasted : भाग्यनगर पोलिसांची झटपट कामगिरी; १२ तासांत बॅटरी चोरीचा...

Battery Thift Arasted : भाग्यनगर पोलिसांची झटपट कामगिरी; १२ तासांत बॅटरी चोरीचा गुन्हा उघड, आरोपी जेरबंद

नांदेड| भाग्यनगर पोलिसांनी तत्परता दाखवत बॅटरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत उलगडा करत आरोपीला अटक केली. या कारवाईत १ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

अटकेत असलेल्या आरोपीकडून ८ बॅटऱ्या (सुमारे ९६ हजार रुपये) आणि एक दुचाकी (९० हजार रुपये) असा एकूण १.८६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलिसांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

गुन्हेगारांना ठेच देत भाग्यनगर पोलिसांनी दाखवलेली ही जलद कामगिरी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments