नवीन नांदेड। महाराष्ट्र क्रीडा युवक सेवा संचनालय पुणे तर्फे आयोजित विभागीय थ्रो बॉल स्पर्धेत इंदिरा गांधी हायस्कूल सिडको येथील अंडर 17 संघाने थ्रो बॉल स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवून हा संघ कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.


या स्पर्धेसाठी इंदिरा गांधी हायस्कूलच्या क्रीडा शिक्षिका सौ.एम. डी.फुलारी यांनी विद्यार्थ्याकडून सराव करून घेतला,या संघाला सकाळ विभागातील क्रीडा शिक्षक प्रा. रमेश नांदेडकर, एम.एल.सूर्यवंशी यांचेही मार्गदर्शन लाभले,या स्पर्धेत खालील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

रितेश अर्जुन चव्हाण, तुकाराम श्रीमंगले, अंकुश मधुबन शहा, महेश ईश्वर लोंढे,अभय जनार्दन साबणे, सुजय रमेश सावळे, यशवंत भालेराव, गौरव संभाजी राचोटकर, यश बालाजी कोरडे, प्रशांत शंकर गंगावणे, अविनाश कैलास राठोड, कुणाल सत्यशील लांडगे,या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण, उपाध्यक्ष अमिताताई चव्हाण, सचिव डी.पी. सावंत , सहसचिव शेंदारकर ,शाळेचे मुख्याध्यापक जी.एम शिंदे ,पर्यवेक्षक यादव ,शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले.
