लोहा| लोहा कंधार तालुक्यातील जनतेनी नेहमीच मला साथ दिली.अडीअडचणीच्या काळात आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात .आपण मोठे केलात .एकमेकाच्या सुखदुःखात धावून जातो हे निवडणुकी पुरते संबंध नाहीत ते हे आपुलकीचे नाते आहे. लोहा विधानसभा मतदारसंघात मी निवडणूक लाढविणार आहे.मी कोणाच्या विरोधात नाही पण कोणी माझे विरोधात असतीलही असे सांगून सोशल मीडियात वाट्टेल ते बोलणे मर्यादा पार करणारे आहे. कोणाला बोलतो आहोत याची भान असले पाहिजे असा सज्जड इशारा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर त्यांनी उचली जीभ लावली टाळूला असे कमेंट करणाऱ्या नेटकाऱ्यांना दिला.

लोहा शहरातील मोंढा येथील गणपती मंदिरात व्यापाऱ्यांशी प्रतापराव पाटील चिखलीकर यांची हितगुज केले.त्याच्या अडीअडचणी जाऊन घेतल्या .यावेळी कृउबा संचालक माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, संचालक व माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम ,सचिन पाटील चिखलीकर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नामदेव कटकमवार, माजी कृउबा संचालक उतरवार,माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल ,दता वाले, बाळू सावकार पालिमकर हरिभाऊ चव्हाण, मारुती पाटील बोरगावकर, शिवसेना विधानसभा प्रमुख मिलिंद पवार, आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष दिनेश तेललवार, मोटरवार, बी डी जाधव ,चंद्रकांत दमकोंडावार, ऍड विलास चव्हाण, दीपक कानवटे, सचिन मुकदम यासह मान्यवर व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतापराव पाटील यांनी व्यापारी व आपले नाते निवडणूक काळा पुरते नाहीत तर जिवाभावाचे आहेत असे सांगून आपण मला नेहमीच साथ दिली आहे. लोहा कंधार तालुक्याने मोठे केले आहे.सर्वसामान्य कुटुंबातील मी कार्यकर्ता आपल्या ताकदीमुळे देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाऊ शकलो.कोणीही उठसुठ सोशल मीडियावर काही बोलते आहे. बोलणाऱ्यानी आपली मर्यादा ओळखली पाहिजे.असे सांगून मी कोणाच्या विरोधात नव्हतो आणि नाही. कोणी माझ्या विरोधात असू शकते मी लोहा विधानसभा निवडणुक लढविणार आहे पक्षश्रेष्ठींना मी सांगितले असे प्रतापरावांनी स्पष्ट केले.

त्यामुळे अन्य चर्चेवर पडदा पडला आहे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार यांनी केले. व्यापारी अध्यक्ष नामदेव कटकमवार यांनी मागील काळात आपली आम्हा व्यापाऱ्यांना कशी मदत झाली व नेहमी आपण धावून येता हे सांगितले व आपल्या सारख्या नेत्यांची गरज आहे असे आवर्जून सांगितले. नामदेव कटकमवार याचा वाढदिवस साजरा केला व प्रतापरावांनी शुभेच्छा दिल्या. डोके तसेच तरुण व्यापारी याचेही अभिष्टचिंतन केले संचलन व आभार भास्कर पाटील यांनी केले.
