Prataprao Patil Chikhlikar : लोहा -कंधारच्या जनतेनी नेहमीच खंबीर साथ दिली – प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL
लोहा| लोहा कंधार तालुक्यातील जनतेनी नेहमीच मला साथ दिली.अडीअडचणीच्या काळात आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात .आपण मोठे केलात .एकमेकाच्या सुखदुःखात धावून जातो हे निवडणुकी पुरते संबंध नाहीत ते हे आपुलकीचे नाते आहे. लोहा विधानसभा मतदारसंघात मी निवडणूक लाढविणार आहे.मी कोणाच्या विरोधात नाही पण कोणी माझे विरोधात असतीलही असे सांगून सोशल मीडियात वाट्टेल ते बोलणे मर्यादा पार करणारे आहे. कोणाला बोलतो आहोत याची भान असले पाहिजे असा सज्जड इशारा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर त्यांनी उचली जीभ लावली टाळूला असे कमेंट करणाऱ्या नेटकाऱ्यांना दिला.
लोहा शहरातील मोंढा येथील गणपती मंदिरात व्यापाऱ्यांशी प्रतापराव पाटील चिखलीकर यांची हितगुज केले.त्याच्या अडीअडचणी जाऊन घेतल्या .यावेळी कृउबा संचालक माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, संचालक व माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम ,सचिन पाटील चिखलीकर व्यापारी असो...
