नांदेड| अतिवृष्टी व पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या विशेष मदतपॅकेजसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील भाजपा तयारीच्या अनुषंगाने खासदार अशोकराव चव्हाण यांनी महत्वपूर्ण माहिती पत्रकार परिषदेत दिली.


मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने तब्बल ३२ हजार कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजला मंजुरी दिली. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेले हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मदतपॅकेज असल्याचे त्यांनी नमूद केले.


✅ पीकनिहाय मिळणारी मदत
- कोरडवाहू पिके – ₹8,500 प्रति हेक्टर (३ हेक्टरपर्यंत)
- बागायती पिके – ₹17,000 प्रति हेक्टर (३ हेक्टरपर्यंत)
- बहुवार्षिक पिके – ₹22,500 प्रति हेक्टर (३ हेक्टरपर्यंत)
- रब्बी हंगामासाठी खत-बीज मदत – ₹10,000 प्रति हेक्टर (३ हेक्टरपर्यंत)
यामुळे एखाद्या शेतकऱ्याला किमान ₹18,500 प्रति हेक्टर इतकी मदत मिळणार आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.


✅ नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या
यापूर्वी १८ सप्टेंबर रोजी नांदेडसाठी ₹553 कोटींची मदत जाहीर झाली होती. नव्या पॅकेजमुळे
७,७४,३१३ शेतकरी आणि ६,४८,५३३ हेक्टर शेतीक्षेत्र लाभार्थी ठरणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व १६ तालुके या पॅकेजमध्ये समाविष्ट आहेत.


✅ पशुधन व इतर नुकसानभरपाई
- दुधाळ जनावरे – ₹37,500
- ओढकाम करणारी जनावरे – ₹32,000
- लहान जनावरे – ₹20,000
- शेळी-मेंढी – ₹4,000
- कोंबडी – ₹100
- गोठ्यांचे नुकसान – ₹3,000
सरकारने पशुधनासाठी संख्येची मर्यादा हटवली असून मृत जनावरांच्या संख्येनुसार मदत दिली जाणार आहे.
✅ जमिनीचे नुकसान व भरपाई
अतिवृष्टीमुळे ४,१३६ हेक्टर जमीन खरडून गेल्याची नोंद आहे.
- गाळ काढण्यासाठी – ₹18,000 प्रति हेक्टर
- जमीन वाहून गेल्यास – ₹47,000 प्रति हेक्टर
- मनरेगामार्फत जमीन पुनर्लागवडीसाठी – ₹3 लाख प्रति हेक्टर (जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत ₹5 लाख)
✅ विहिरी, घरे, मृत्यू व अपंगत्वासाठी मदत
- सिंचन विहिरी दुरुस्ती – ₹30,000 (मनरेगा अंतर्गत)
- मृत व्यक्तीच्या कुटुंबाला – ₹4 लाख
- 40-60% अपंगत्व – ₹74,000
- 60% पेक्षा अधिक अपंगत्व – ₹2.5 लाख
- जखमी (१ आठवड्यापेक्षा जास्त अॅडमिट) – ₹16,000
- जखमी (१ आठवड्यापेक्षा कमी) – ₹5,400
- कच्च्या-पक्क्या घरांच्या पडझडीसाठी स्वतंत्र मदत
✅ दिलासा पॅकेजअंतर्गत सवलती
- जमीन महसूल माफी
- सहकारी कर्ज पुनर्गठन
- कर्जवसुलीला स्थगिती
- तिमाही वीजबिल माफी
- विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क व फी माफ (१०वी-१२वीसह)
✅ पायाभूत सुविधा दुरुस्तीसाठी १० हजार कोटी
रस्ते, कालवे, वीजपुरवठा आणि इतर तातडीच्या कामांसाठी राज्य सरकारने १० हजार कोटींची घोषणा केली आहे.
👉निवडणुकीसाठी भाजपा सज्ज
पत्रकार परिषदेत दुसरा मुद्दा म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानपरिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत निवडणूक तयारीबाबत चर्चा झाली. “निर्णय पक्षनेतृत्व घेईल; पालन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत… ‘है तैय्यार हम’,” असे चव्हाण म्हणाले.
✅ निवडणूक तयारीची सद्यस्थिती:
- बूथ कमिट्या गठीत
- तालुका व जिल्हा कार्यकारिणी जाहीर
- इच्छुक उमेदवारांचे अर्ज लवकरच मागवले जाणार
- दिवाळीच्या आसपास नांदेड शहरातील भाजपा केंद्रीय कार्यालयाचे उद्घाटन
- पदवीधर मतदारसंघासाठी मतदान नोंदणी सुरु
✅ विकासासंदर्भातील मागण्या मुख्यमंत्रीसमोर
- नांदेड-लातूर नवीन रेल्वे मार्ग
- नांदेड-बिदर रेल्वे मार्ग
- मोठी गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती
- एमआयडीसीसाठी भूसंपादन
- नांदेडमध्ये पोलीस आयुक्तालय
- नांदेड-हैद्राबाद वंदे भारत
- नांदेड-गोवा व मुंबई विमानसेवा
✅ उपस्थित मान्यवर
भीमराव केराम, राजेश पवार, तुषार राठोड, जितेश अंतापूरकर, श्रीजया चव्हाण, अमरनाथ राजूरकर, किशोर देशमुख, किशोर स्वामी, संतोष पांडागळे आदींची उपस्थिती होती.


