हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहराच्या परिसरात असलेल्या श्री सुभाष शुगर कारखाना प्रा.लि.व ईतर साखर कारखान्याच्या ओव्हरलोड ट्रकटर व ट्रकद्वारे तालुक्यातुन उसाची वाहतुक होते आहे. विशेषतः ग्रामीण भागातुन ट्राली व ट्रक सह्याने क्षमतेपेक्षा आधिक उस भरल्याजात असल्याने धोका निर्माण झालेला आहे. हदगाव शहरातुन ही जीवघेणी वाहतुक होत आसल्याने व शहरात एकच मुख्यरोड असल्याने आपघाता ची नेहमीच भिती असते. यामुळे वाहतुक खोळबत असून, उस कारखाना प्रशासनाने हे उसाचे ओव्हरलोड ट्रक वाहने शहराच्या बाहेरुन जाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होतांना दिसुन येत आहे.
याकडे प्रादेशिक परिवाहन विभाग नादेडचे माञओव्हरलोड “वाहनाकडे कमालीचे दुर्लक्ष होतांना दिसुन येत आहे. यामुळे इतर वाहनाने प्रवास करणा-या अन्य वाहनधारकांना व प्रवाशाना माञ जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. नादेड -नागपुर या राष्ट्रीय महा मार्गावर नेहमी अपघाताची भीती असते विशेष करुन त्यात उस वाहतुक करणा-या अन्य वाहनाना नेहमी आपघात होण्याचा धोका आसतो.
ग्रामीण भागातील गावाच्या परिसरातुन उसाची वाहने काढण्या करिता चालकांना फार कसरत करावी लागते. तर कधी विद्युत तारेचा स्पर्श होण्याचा फार धोका असतो. ओव्हरलोड वाहनामुळे वळण रोडवर आपघाताची शक्यता असते. यामुळे उस वाहतुक करणा-या वाहनचालकानी क्षमते पेक्षा उस न भरण्याची काळजी घेतली तर पुढील आपघात टाळु शकते. हदगाव तालुक्यात रोडचे बोगस काम झाल्या मुळे रोड खिळखिळ झालेले आहे. ट्रक व ट्रक्टर चालकाना परिवहन विभागाने सुचना देणे व ओव्हरलोड वाहना विषयी जनजागृती करने आवश्यक आहे.
कारखाना प्रशासन दखल घेईल का …?
हदगाव तालुक्यात उसाची ओव्हरलोड वाहतुक होत आसतांना राष्ट्रीय महामार्गावरवाहनाची गती वाढलेली आहे. भरधाव वेगाने वाहने धावतात पण उसाच्या बहुसंख्य वाहनांना ‘रिफ्लेक्टर’ असणे अवश्यक आहे. कारण ऐखादे ओव्हरलोड वाहन नादुरुस्त झाल्यास रोडवरच वाहने उभी करावी लागत आहे. आणखी विशेष म्हणजे हदगाव शहराजवळ श्री सुभाष शुगर प्रा.लि हडसनी येथे असुन, तामसा राज्य महामार्गावर ओव्हरलोड उसाचे ट्रक थाबत आसल्याने रहदारीला ञास होत आहे. बहुसंख्य अतिदक्षतेचे पेशट अँब्लुन्स व इतर वाहना द्वारेच नादेडला नेण्यात येताता. विशेष म्हणजे लोड केलेले उसाचे वाहन करिता कारखाना परिसरात भरपुर जागा असतांना माञ या रोडच्या बाजुला भरलेली उसाची वाहने उभी करण्यात येतात.