नांदेड। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे हे आज दिनांक 24 जून रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. खा. चंद्रकांत हंडोरे यांना भेटण्यासाठी भीमशक्तीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन नांदेड जिल्हा भिमशक्ती च्या वतीने करण्यात आले आहे .
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
खा. चंद्रकांत हंडोरे यांचे सोमवार दिनांक 24 जून रोजी हैदराबाद येथून दुपारी एक वाजता नांदेड विमानतळावर खाजगी विमानाने आगमन होईल. त्यानंतर ते शासकीय विश्रामगृह येथे भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांशी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी हितगुज करतील. त्यानंतर एका खाजगी कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहतील. त्यामुळे काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि भीमशक्तीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रगृह येथे उपस्थित राहावे असे अहवान नांदेड जिल्हा भिमाशक्तीच्या वतीने करण्यात आले आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)