बाबुराव कदम कोहळीकर विधानसभेच्या दुसऱ्या ईनिंग करिता तयार; सहानुभूतीची लाट यावेळी तारणार..? -NNL
हदगाव, शेख चांदपाशा। कोणतेही पद नसताना हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाच्या विकासा बरोबर सर्वसामान्य नागरिक शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी, पैनगंगा नदीकाठावरील जनेतच्या पाणी समस्यासाठी बाबुराव कदम कोहळीकर यांनी जीवाचे रान केले आहे. त्यांच्या याच सामाजिक कार्यामुळे सर्वसामान्य जनतेतून त्यांना लोकनेते तथा शेतकरी नेते म्हणून समबोधले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हदगाव हिमायतनगर मतदार संघात कोट्यवधींचा निधीतुन पैनगंगा नदीवर पूल कमं बंधारे मंजूर करून आणत, विविध रस्ते, समाज भवन यासह अनेक गरजू वंचितांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी मोलाचा वाट उचलला आहे. त्यांच्या याचं कार्याची पावती म्हणून लोकसभा निवडणुकीत जनतेने भरघोस मतदान दिले, मात्र यात त्यांचा प्रभाव झाला. असे असले तरी पुन्हा नव्या जोमाने त्यांनी मतदार सांघट आपली पकड मजबूत करण्याला सुरुवात केली असून, त्यांनी हदगाव...
