हिमायतनगर| अंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धेमध्ये रनिंग (धावणे )5000 व 10000 मिटर स्पर्धेमध्ये प्रथम गोल्ड मेडल विठ्ठल आशोक राठोड तसेच अंतर महाविद्यालय क्रीडा खो-खो स्पर्धेमध्ये महिला गटामध्ये हु ज.पा. महाविद्यालयास द्वितीय सिल्वर मेडल पारितोषक पटकवले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतर महाविद्यालयीन विभाग खो-खो क्रीडा स्पर्धामध्ये पुरुष व महिला शैक्षणिक वर्ष 2024-25 संपन्न झाले.
सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ.उज्वला सदावर्ते मॅडम त्याच प्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉ. व्यंकट माने व डॉ.यशवंत कल्लेपवार तसेच उद्घाटक म्हणून डॉ. भास्कर माने लाभले होते. त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयाचे क्रीडा संचालक आदरणीय डी. के. माने सर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर स्पर्धाना सुरुवात झाली.
दिनांक 05/10/2024 रोजी पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयास महिला गटामध्ये खो- खो स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक पटकावले यामध्ये आदरणीय माने सर यांचे खूप मोठे योगदान संघासाठी लाभले त्याचप्रमाणे गुंडाळे सर व शहेनाज मॅडम यांच्या देखील सहाय्य संघासाठी खूप उपयुक्त ठरले. हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हे ग्रामीण भागातील असून अतिशय उत्कृष्टपणे महिला संघ दुतीय ठरला संपूर्ण संघाचे माननीय प्राचार्य मॅडम व संपूर्ण महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संघाचे खूप खूप अभिनंदन केले.