हिमायतनगर,अनिल मादसवार| आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी निवडणूक आयोग करत असून, विजयदशमी नंतर आचारसंगीता लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीने आपला उमेदवार कोण हे जाहीर केले नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. अश्यातच भाजपच्या शिष्टमंडळाने 1992 पूर्वी भाजपाकडे असणारी हादगाव हिमायतनगर विधानसभेची जागा भाजपला सोडा अशी मागणी केल्याने उमेदवारी कोणाला सुटते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
1992 पासून महायुती मध्ये शिवसेनेकडे गेलेली हादगाव हिमायतनगर विधानसभेची जागा भाजपाला सोडण्यात यावी. आहि मागणी मुंबई येथे हादगाव हिमायतनगरच्या भाजपा शिष्टमंडळाने मुंबई येथे विधानसभा कोर कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपा महाराष्ट्रचे सरचिटणीस संजयजी केणेकर आणि महाराष्ट्रचे सचिव विक्रांतदादा पाटील यांची भेट घेऊन केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर या भागात भा.ज.पा. कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केलेले आहे. राजकीयदृष्ट्या भा.ज.पा. कार्यकर्त्यांचे मतदार संघात मोठे जाळे निर्माण झाले आहे. त्यास अनुसरुन श्री.चंद्रशेखर राजाराम कदम पाटील, प्रदेश कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य, संयोजक ८४- हदगाव हिमायतनगर विधानसभा भा.ज.पा., महाराष्ट्र राज्य, तातेराव तुकाराम वाकोडे (पाटील), तालुकाध्यक्ष हदगांव, भा.ज.पा., मु.पो. पिंपरखेड, ता. हदगांव, जि. नांदेड यांनी ८४ हदगाव हिमायतनगर विधानसभा ही जागा भारतीय जनता पक्षास मिळण्याकरिता विनंती केली आहे.
त्या अनुषंगाने पक्षश्रेष्टींने सहानुभूतीपूर्वक विचार करून ८४ हदगाव हिमायतनगर विधानसभा ही जागा भारतीय जनता पक्षास सोडून कार्यकर्त्यांना बळ द्यावे असेही शिष्टमंडळाने म्हंटले आहे. जागा भारतीय जनता पार्टीला सोडण्यात यावी यासाठी राज्याचे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची पण भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. सध्या महायुतीकडून शिंदे गटाचे नेते विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. अश्यातच भाजपच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीमुळे हदगाव हिमायतनगर विधानसभा कोणाला सुटते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या शिष्टमंडळात हिमायतनगर येथील गजानन तुप्तेवार, एड.रावसाहेब देशमुख, सुधाकर पाटील, हादगाव येथून लताताई फाळके, रामभाऊ सूर्यवंशी, चंद्रशेखर पाटील, तुकाराम चव्हाण, सुप्रिया मुनेश्वर, चंद्रकांत हनवते, बाळा पाटील आदींसह हदगाव हिमायतनगर तालुक्यातील कार्यकर्ते होते.