HomeनांदेडKinwat ; किनवट दक्षिणच्या भाजपा तालुका अध्यक्षपदी सूर्यकांत आरडकर यांची एक मताने...

Kinwat ; किनवट दक्षिणच्या भाजपा तालुका अध्यक्षपदी सूर्यकांत आरडकर यांची एक मताने निवड

किनवट, परमेश्वर पेशवे l किनवट दक्षिणच्या तालुका अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी नियोजन समिती सदस्य सूर्यकांत आरडकर यांची इस्लापूर येथील विश्रामगृहामध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम, माजी राज्यमंत्री डी बी पाटील, भाजपा जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख, भाजपा संघटन प्रमुख संजय कौडगे, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली किनवट विधानसभा दक्षिण तालुका अध्यक्ष निवडणूक प्रमुख अनिल वाघमारे , संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाही पद्धतीने दक्षिण भाजपा तालुका अध्यक्षपदी सूर्यकांत आरडकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

याप्रसंगी भाजपा विधानसभा प्रमुख बाबुराव केंद्रे ओबीसीचे नेते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विधानसभा क्षेत्रातील पक्ष वाढीसाठी व पक्षाचे संघटन वाढीसाठी नव्यानेच नियुक्त झालेल्या अध्यक्षांनी गटा तटातील वाद बाजूला ठेवून पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीचे काम जोमाने करावे असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोविंद अंकुरवाड यांनी पक्ष संघटन करत असताना कार्यकर्त्याला विश्वासात घ्यावे येत्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षाला बळकटीकरण कशा पद्धतीने मिळवता येईल व पक्षाचा फायदा कशा पद्धतीने होईल याकडे नूतन अध्यक्षांनी लक्ष वेधावे अशा मार्मिक सूचनाही दिल्या. 

IMG 20250420 WA0003 Kinwat ; किनवट दक्षिणच्या भाजपा तालुका अध्यक्षपदी सूर्यकांत आरडकर यांची एक मताने निवड

ही निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कार्यक्रमाच्याप्रसंगी नूतन तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरडकर यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन व पक्ष हिताच्या बाबीचा विचार करून किनवट विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक खेड्यापाड्यात पोहोचवून कार्यकर्त्याची मत जाणून घेऊन कशा पद्धतीने पक्षाचे बळकटीकरण करता येईल. व पक्षातील कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने न्याय देता येईल यासाठी सदैव प्रयत्नशील राहील. माझ्यावर किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांनी व भाजपाचे नेते डी.बी पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख यांनी मोठा विश्वास टाकून तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली यासाठी मी सार्थ ठरेल अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी दिली.

IMG 20250420 WA0005 Kinwat ; किनवट दक्षिणच्या भाजपा तालुका अध्यक्षपदी सूर्यकांत आरडकर यांची एक मताने निवड

या कार्यक्रमात प्रसंगी किनवट पंचायत समितीचे माजी उपसभापती कपिल करेवाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सूर्यनारायण पाटील, भाजपाचे नांदेड जिल्हा सचिव काशिनाथ शिंदे,अप्पाराव पेठचे माजी सरपंच भूमेश किनी, विवेक केंद्रे ,रवी चव्हाण, रमेश बोडेवाड, श्रीधर रेड्डी, गणेश पाटील, बाल गंगाराम भुशीवाड ,सागर पिसालीवार, शंकर मानकर, सतीश सोंडारे, हनुमंतू भुशीवाड संग्राम बिरकुले, कैलास जाधव, भाऊराव आडे, विठ्ठल नारदकर सत्यनारायण पोगूलवाड, प्रकाश दंडे, राजू आंबटवाड ,संदीप पाटील,विकास माहुरकर ,बालाजी पळसपुरे रवी कसबे , सूर्यकांत बोधनकर, प्रभाकर बैनवाड, सुरज लासीनकर, बंडू शिंदे, यांच्यासह परिसरातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

IMG 20250420 WA0006 Kinwat ; किनवट दक्षिणच्या भाजपा तालुका अध्यक्षपदी सूर्यकांत आरडकर यांची एक मताने निवड

भाजपाने किनवट दक्षिण तालुका अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्यकांत आरडकर यांची निवड करून एक प्रकारे त्यांनी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाच्या वेळी केलेल्या कार्याची पावतीची परतफेडच केली म्हणावी लागेल. व निष्ठावंताला न्याय दिला अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यातून ऐकावयास मिळत आहेत .

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments